Home महाराष्ट्र गंगाखेड येथील तपासणी शिबिरात ५५४ दिव्यांची निवड

गंगाखेड येथील तपासणी शिबिरात ५५४ दिव्यांची निवड

320

🔹निवड झालेल्या एकूण दिव्यांगांना आ. गुट्टे यांच्या वतीने १ कोटी २५ लक्ष रूपये पेक्षा अधिक किंमतीचे व ९४९ प्रकारचे साहित्य मिळणार

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13मे):-सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार तसेच समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद परभणी आणि आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या संयुक्त विद्यमाने एडीप (ADIP) योजना अतंर्गत दिव्यांगांना कृतीम अवयव आणि सहाय्यभुत साधने मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी व नोंदणी शिबिराचे दि. ७ मे ते ९ मे २०२२ रोज दरम्यान आयोजन करण्यात आले होते. गंगाखेड शहरातील संत जनाबाई महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिन दिवसीय शिबीरामध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघासह परिसरातील दिव्यांग आणि मोठ्या प्रमाणात या तपासणी शिबिरात सहभाग नोंदविला होता. सुरुवातीला या शिबिराचे दि. ७ व ८ मे रोजी आयोजन केले होते. परंतु दिव्यांगाचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता एक दिवसाने या शिबिराची तारीख वाढवून ९ मे पर्यंत दिव्यांगाची या शिबिरात तपासणी व नोंदणी घेण्यात आली. यात ५५४ दिव्यांगाची निवड करण्यात आली असून यातील एकूण दिव्यांगांना १ कोटी २५ लक्ष रुपयांपेक्षा अधिक किमतीचे व गरजेनुसार ९४९ प्रकारचे साहित्य आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यावतीने वाटप करण्यात येणार आहे.

आ.गुट्टे यांच्या प्रयत्नाने आयोजित या शिबिरामुळे मतदारसंघासह परिसरातील दिव्यांगांना गरजेनुसार साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याने दिव्यांगाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.यावेळी डॉ.संकेत देरवलकर, डॉ. काजल खाडे, डॉ.शामललित यादव ही डॉक्टर मंडळी कानपूर राजस्थान येथून गंगाखेड शहरात दाखल झाली होती. डॉ. अर्चना गोरे, डॉ. तेजस तांबोळी, नसीम खान, रवी इक्कर, नाना वाकडीकर, यांनी या शिबिरात मोलाचे सहकार्य लाभले. कवी विठ्ठल सातपुते, विष्णु वैरागड अभिजीत चक्के, प्रभाकर माळवे, सचिन राठोड प्रभाकर सातपुते शाम ठाकूर,गोपी नेजे, ऋषिकेश बनवसकर, राहूल गाडे, धनराज बीडकर, चेतन पंडित यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here