Home महाराष्ट्र माणिकडोह आदिवासी विविध सहकारी सोसायटी अध्यक्षपदी दिपक तायवाडे,उपाध्यक्षपदी अरविंद राठोड यांची अविरोध...

माणिकडोह आदिवासी विविध सहकारी सोसायटी अध्यक्षपदी दिपक तायवाडे,उपाध्यक्षपदी अरविंद राठोड यांची अविरोध निवड

224

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.13मे):-तालुक्यातील माणिकडोह १२ सदस्यीय आदिवासी सहकारी सोसायटीची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे.

या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी सांडवा येथील दिपक तायवाडे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा सांडवा येथील माजी सरपंच अरविंद राठोड यांची निवड करण्यात आली.

या निवडीने समस्त मतखंडामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात बोलताना अरविंद राठोड म्हणाले की जनतेने त्यांच्यावर जो विश्वास टाकला आहे. तो विश्वास जनतेची कामे करून त्यांची सेवा करून सार्थकी लावेल.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीराम पवार ,भोलानाथ कांबळे, धनसळ येथील सरपंच प्रविण नाईक तसेच ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here