



✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.13 मे)- तालुक्यातील मालेवाडा येथील 32 वर्षीय विवाहित इसमाने आपले शेतातील सागाचे झाडाला दोर बांधून आत्महत्या केल्याची घटना आज(13 मे) सकाळी 7 वाजताचे दरम्यान उघडकीस आली.
मृतक इसमाने नाव ज्ञानेश्वर नामदेव पोईनकर हा आपल्या शेतात रात्रीच गेला असावा,असा अंदाज गावकरी करीत आहेत, शेताचे बाजूला असलेल्या विटाभट्टी येथे काम करणाऱ्या कामगार यांना पोईकर यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला, त्यांनी ही माहिती गावकऱ्यांना सांगितली, माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेतात गर्दी केली, दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी चिमुर उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
आत्महत्या करणारा इसम अल्पभूधारक शेतकरी असून असल्याची चर्चा आहे, सदर शेताची नोंद मृतकाचे नावाने आहे की वडिलांचे? याबाबत माहिती मिळाली नाही.आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी, असा तर्क गावकरी लावत असले तरी आत्महत्येचे खरे कारण पोलिस तपासणीत पुढे येईल.मृतकाला पत्नी, दोन मुले आहेत.


