



✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308
कुरुल(दि.13मे):- केंद्र शासनाच्या धोरणानुसार आता दिव्यांगना एक युनिक आयडी दिले जाणार आहे भारत सरकारच्या समाजकल्याण योजने अंतर्गत जे दिव्यांग प्रमाणपत्रापासून आजून वंचित आहेत आशा दिव्यांग लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर 2022 पर्यन्त आपल्या जवळच्या ग्रामीण रूग्णालयात किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण आपले आधार कार्ड नोंदणी करून असणाऱ्या स्वावलंबन वेबसाईट वर जाऊन आपण आपले आधार कार्ड व आपली माहीती सबमिट करून आपण आपले आॅनलाईन सर्टिफिकेट करून घ्यावे म्हणजे आपल्याला समाजकल्याण विभागाकडील हक्काच्या ५%व ४% हक्काच्या योजनाचा लाभ घेता येईल जसे ग्रामपंचायत निधी , पंचायत समितीचा निधी, आमदार फंड,बॅक नॅशनल फंड , शाळेतील परीक्षा वाढीव आर्धा तास,एस टी पास, रेल्वे पास ,टोल नाका पास,दिव्यांग अंतोद्य शिधापत्रिका,संजय गांधी निराधार योजना,वित्त आयोगातील तरतुदी,एक डिसाब्लेटी एक युनिक आयडी आता नुकतेच महाराष्ट्र राज्य दिव्यंग आयुक्त यानी ११/५/२२ ला एक शासन निर्णय पारीत केला आहे की दिव्यांग व्यक्तिनी या पुढे कोणत्याही प्रकारच्या योजनेसाठी नवीन युनिक आयडी कार्ड काढण्याची गरज नाही तेव्हा दिव्यांगचे काम मोठे झाले आहे.
परंतु ज्या दिव्यागकडे आधार कार्ड लिंक नाही अशा दिव्यांग लाभार्थ्यांनी आधार कार्ड लिंक करून घ्याण्याची विनंती .दिव्यांग पुनर्वसन मार्गदर्शन व सल्ला केंद्र पोहोरगाव
प्रहार अपंग क्रांती संघटना पंढरपूर यानी केली आहे.


