




✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.12मे):-श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन गुलदगड व महिला आघाडी च्या प्रदेश अध्यक्षा अनुराधाताई गडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका महिला आघाडीच्या वतीने 11 मे महात्मा दिन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले यांना मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेच्या माध्यमातून समाजमनात प्रेरणास्थान असल्याने महात्मा ही पदवी 11 मे 1888 रोजी प्रदान करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून श्री संत सावता माळी युवक संघाच्या तालुका महिला आघाडी च्या वतीने 11 मे महात्मा दिन म्हणून साजरा करण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तसेच चोपडा येथील तपस्वी मारोती जवळील महात्मा फुले स्मारक येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित असलेल्या महिला व नागरिकांना तसेच समाजातील जेष्ठ मंडळींना जोतीरावांच्या कार्याची उजळणी तसेच ज्योतिरावांना 11 मे रोजी दिलेली महात्मा ही पदवी याविषयीची सविस्तर अशी माहिती महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा कित्ती महाजन यांनी करून दिली.सदर कार्यक्रमाला जेष्ठ महिला इंदूबाई माळी, हिराबाई माळी, ज्योती मगरे, मनिषा महाजन,अंजना माळी महिला आघाडी तालुका उपाध्यक्षा हर्षानंदा महाजन तालुका कार्याध्यक्षा मीना महाजन, तालुका सचिव माया महाजन, आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महिला आघाडी च्या तालुका सचिव माया महाजन यांनी मानले.




