



🔹जागतिक आंतरराष्ट्रीय परीचर्या दिवस
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
वरोरा(दि.12मे):-सर्वांना आंतरराष्ट्रीय परीचर्या दिनाच्या तसेच फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल यांच्या जयंती च्या अमृत महोत्सवी वर्षात हार्दिक शुभेच्छा . आजचे यूग हे आधुनिक यूग आहे फ्लाॉरेंन्स नाईटिंगेल यांना आधूनिक परीचर्यच्या जनक म्हणतात.त्यांचा जन्म इटलीतील फ्लॉरेन्स येथे झाला श्रीमंत घराण्यांत वाढलेल्या होत्या परंतु त्यांना वेढ लागलें होतें गरीबा़ंची सेवा करण्याचें. मनात ध्येय आणि द्रुढ विश्वास घेऊन त्यांनी आरोग्य सेवाचे आपले शिक्षण करून दिनदुबढ्यांची सेवा करू लागल्या . वडीलांना ते मान्य नव्हते . त्यांनी परीचर्या स्कुल सुरू केले.आणी खरी रुग्ण सेवा कशी असते कशी असावीत याविषयी खुप अभ्यास केला आणि नवनवीन अभ्यासक्रम संशोधन करून आपल्या विभागाचै नावलौकिक वाढविले. दुसऱ्या महायुध्दात असंख्य सैनिक धारातिर्थी परले . मरणाऱ्याची संख्या वाढतीवर होती. तेव्हा त्यांची नियुक्ती युद्धातील सैनिकांची सेवा करण्यासाठी झाली.
त्यांच्या उपाययोजनेने सैनीक लवकर चांगलें होऊ लागले. त्यांनी अहोरात्र सैनीकांची सेवा केली. त्या काळात लाईटिंगची व्यवस्था नव्हती तर त्या रात्री आपल्या हातात कंदील घेऊन रुग्णांची सेवा करत होत्या.जनरल ऑफीसर्स यांनी त्यांचें काम बघीतले स्वतः ची झोप मोडून अहोरात्र झटत आहेत आणि त्यांच्या या भावव्रतीमूळे सैनीक लवकर बरे होत आहे. म्हणून त्यांना लेडी वीथ लाॅम्प या उपाधिने गौरविण्यात आले.त्यांचे ज्ञान अगाद होते.संख्या शास्त्र ,ध्रविय शास्त्र परीचर्या शास्त्रांची उत्पत्ती त्यांचीच.रेडक्रासचे संस्थापक जॉन हेंन्द्री दूणांत यांनी त्यांना लेडी वीथ लाॅम्प ही उपाधी देऊन गौरविण्यात आले.च्यांच्या हातातील कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सेवा केल्याने परीचर्या शास्त्राला नवी दिशा मिळाली. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचा जन्मदिवस हा आंतरराष्ट्रीय जागतिक परीचारिका दिन म्हणून जागतिक पातळीवर साजरा करण्यात येतो. त्या काळात कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या त्यावर मात करून स्वतः उपाययोजना तयार करून सैनीकांना बरे करण्यात यश मिळवले.
संख्याशास्त्राची कुठल्याही पदवी नसतांना त्यांना 1859 मध्ये राॅयल स्टाटास्टिकल पहील्या महीला सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. 1883 मध्ये राणी व्हिक्टोरिया यांनी त्यांना रायल रेड क्रॉस पदवींने सन्मानीत करण्यात आले. 1907 मध्ये ब्रिटिश सरकार कडून आॅर्डर आॅफ मेरीट या उपाधीने सन्मानित करण्यात आले. ह्या किताब्याच्या त्या पहिल्या महिला होत्या. 1910 च्या सुमारास त्यांना अंधत्व आले.
आजचे युग हे स्पर्धेचे , धकाधकीचे आहे त्यावर मात करून सर्व नर्सिंग आॅफीसर्स यांनी आपले काम चोख बजावले पाहिजे.तरच खरी फ्लारेंन्स नाईटिंगेल यांची जयंती सफल झाल्याचे दिसून येईल.कोरोना काळात खरी नर्स लोकांना कळली. तोपर्यंत ती उपेक्षितच होती.जीवाची बाजी लावून त्याही ही लढाई जिंकल्या .खरोखर आपला जीव पणाला लावून कोरोनावर मात करून ही लढाई जिंकणार्या सर्व नर्सिंग ऑफीसर्स ला मानाचा मुजरा आणि ज्यांनि आपले प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली आणि 13 ऑगस्टला फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांची प्राणज्योत मालवळी. ज्यांनी कोरोणा काळात हे उत्तम कार्य केले त्या सर्व संकटकाळातील फ्लाॅरेंन्सच होत्या. (सौ. वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर)


