Home महाराष्ट्र विवेक बोढे यांनी घुग्घुसच्या जनतेचे सेवाव्रत स्वीकारले – देवराव भोंगळे

विवेक बोढे यांनी घुग्घुसच्या जनतेचे सेवाव्रत स्वीकारले – देवराव भोंगळे

342

🔹भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.12मे):-बुधवार 11 मे रोजी घुग्घुस येथे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.सकाळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रा. आ. केंद्रात रुग्णांना फळ व शीतपेयाचे वाटप केले. संजय तिवारी मित्र परिवारातर्फे श्रीमती लीला शंकर घोगुर्ले या निराधार महिलेस आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात आर्थिक मदत करण्यात आली. लाभार्थ्यांना नवीन शिधापत्रिका वाटप करण्यात आली. सायंकाळी प्रयास सभागृहात भाजपा देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर आयोजकांचा सत्कार तथा आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाच्या विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी उप महापौर राहुल पावडे, महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, किरण बांदूरकर, चिन्नाजी नलभोगा, रत्नेश सिंग, मधुकर मालेकर, नीलकंठ नांदे, प्रमोद येलचलवार, पारस पिंपळकर, सिनू इसारप, पूजा दुर्गम, कुसुम सातपुते, सुचिता लुटे, वैशाली ढवस, राजकुमार गोडसेलवार, महेश लठ्ठा, संजय भोंगळे, श्रीकांत माहुलकर, दीपक जैस्वाल, सुनील राम, राजेश मोरपाका, प्रवीण सोदारी उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा आप्तपरिवारासह अभीष्टचिंतन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले विवेक बद्दल बोलायचं झाल्यास खरंच शब्द अपुरे पडतील मी ज्या उद्देशाने आणि उर्जेने माझ्या घुग्घुसच्या जनतेच्या सेवेचे व्रत स्विकारले होते ते सेवाव्रत विवेकने आजही अखंडितपणे सुरू ठेवले आहे. मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून परिसरातील गोरगरिबांच्या, उपेक्षित, वंचितांच्या हाकेला ओ देऊन त्यांची समस्या पूर्णपणे निकाली निघाल्याशिवाय विवेक व टिम भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे असतात. आजवर कित्येक नागरिकांच्या मोठ्या जटिल व खर्चिक शस्त्रक्रिया, विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ, वृद्धांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, टँकरने पाणीपुरवठा, श्रमिक कार्ड इ. अशी कित्येक कामे सांगता येतील, ज्यांसाठी विवेक सतत आटापिटा करतो. दिलेल्या जबाबदारीच्या यशस्वीतेसाठी तो स्वतःला झोकून देऊन काम करतो. आज जिल्ह्यामध्ये घुग्घुस येथील कार्यक्रमांची, अभिनव उपक्रमांची स्तुती केली जाते.

याचे श्रेय निश्चितचं विवेक व त्याच्या टिमचे आहे. “लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासाठी समानार्थी शब्द म्हणजे सेवा” आणि याच शब्दानुरुप विवेक सुधीरभाऊ सेवा केंद्रातून जनसेवेसाठी तत्पर असतो. खरेतर, विवेक समरस होणारा कार्यकर्ता आहे. आणि कार्यकर्ता कर्ताधर्ता असा विचार बाळगण्याऱ्या माझ्या भाजपात विवेक सारखे शिलेदार असल्यानेच पक्षसंघटनेला बळ मिळतो. कार्यक्रमांचा भडीमार किंवा अनेक प्रश्नांचा ससेमिरा असला तरी आपल्या उत्तम व सुक्ष्म नियोजनाने कोणतेही कार्य सर्वोत्तम करण्याची विवेकची हातोटी वाख्याणाजोगीच आहे.

आज वाढदिवसाच्या निमित्तानं, पुनःच्छा त्याला दीर्घार्युरोग्याची कामना करत विवेकने आपल्या प्रगतीचा तसेच जनसेवेचा आलेख उंचावतचं रहावा! अशी सदिच्छा याठिकाणी बोलताना व्यक्त केली.प्रास्ताविक भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले.कार्यक्रमात लाभार्थ्यांना मोफत नवीन शिधापत्रिका वाटप करण्यात आली. रक्तदान शिबिराच्या आयोजकांचे सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. व्यापारी संघटना, ऑटो संघटना, सामाजिक संघटना, कामगार संघटना यांच्यातर्फे केक कापून भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे संचालन व आभार साजन गोहने यांनी व्यक्त केले. आभार सुरेन्द्र भोंगळे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुड्डू तिवारी,अमोल थेरे,अजगर खान, बबलू सातपुते, विनोद जंजर्ला, संजय जोगी, धनराज पारखी, नितीन काळे, श्रीकांत सावे, तुलसीदास ढवस, शरद गेडाम, रवी बोबडे, स्वपनील इंगोले, आतिष मेळावार, वामशी महाकाली, पियूष भोंगळे, संकेत बोढे, हेमंत कुमार, गणेश बोबडे, विक्की सारसर, शंकर नागपुरे प्रयास सखी मंच मार्गदर्शिका अर्चना भोंगळे अध्यक्ष किरण बोढे, वैशाली ढवस, पूजा दुर्गम, कुसुमताई सातपुते, नंदा कांबळे, सुषमा सावे, पुष्पाताई रामटेके, दीपा वडस्कर, सारिका भोंगळे, सीमा पारखी, शारदा गोडसेलवार, कविता आमटे सुनीता पाटील, चंद्रकला मन्ने, यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास मोठया संख्येत महिला व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here