



✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.11मे):-येथील नामांकित अशा अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एम.पी.एस.सी. परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून महाराष्ट्र शासनाच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या जलसंपदा विभाग राजपत्रित अधिकारी म्हणून नेमणूक झाल्याबद्दल हा सत्कार आयोजित करण्यात आला होता.सत्कार समारंभ कार्यक्रमापूर्वी ज्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवली असे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रथमतः सत्कार मूर्ती गौरी पिसे व रोहित नामदास यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच पिसे दाम्पत्यांचा व विलास नामदास सर यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना माणदेशी महिला बँकेच्या संचालिका सौ वनिता पिसे म्हणाल्या की कुठलेही कार्य करताना विशिष्ट पाठबळाची गरज असते आणि अहिंसा पतसंस्था प्रामुख्याने नितिन भाई दोशी हे नेहमीच शिक्षण, क्रीडा,सामाजिक,क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात त्यांना नेहमी त्यांनी पाठबळ द्यायचं काम केलेला आहे. त्यांचे हे पाठबळ या सर्वांमध्ये नवचेतना निर्माण करते व संघर्ष करण्याची त्यांची शक्ती वाढवते आणि त्याचा फलित म्हणजे आज कुमारी गौरी पिसे व रोहित नामदास हे जलसंपदा विभागात राजपत्रित अधिकारी झाले.
त्यामुळे नितिन भाईंसारख्या पाठीवर शाबासकीची थाप देणाऱ्या व्यक्तींचे खरच मनोमन आभार मानले पाहिजे त्यांच्यामुळे आपल्या शहरात अधिकाऱ्यांची रिघ लागलेली आपणास पहायला मिळते.यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब टाकणे म्हणाले की प्रत्येकाच्या मनामध्ये एक सुप्त गुण लपलेला असतो गरज असते ती तो बाहेर काढण्याची आणि माननीय नितिनभाई दोशी साहेब यांच्या मध्ये तो लपलेल्या सुप्त गुण बाहेर काढण्याचा गुण आहे असे मला वाटते. माणसाने आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहिल्यानंतर पुढच्या गोष्टी सुकर होतात. आणि गौरी पिसे व रोहित नामदास ही दोन्ही मुलं आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक राहिली त्यामुळे आज या पदावर ती विराजमान आहेत.ज्या क्षेत्रात म्हणजे जलसंपदा विभागात आपण कार्यरत आहात ते लोकांना पाणी पुरवण्याच्या विभागात तुम्ही कार्य करत आहात त्या पाण्यासाठी माननीय नितिनशेठ दोशी यांनी आणि अनेक आंदोलने केली आहेत. त्यांच्या पाणी आंदोलनाच्या कार्याला टाकणे यांनी उजाळा दिला. ज्या पद्धतीने पाणी चळवळ झाली होती या त्यांच्या चळवळीसाठी त्यांनी जे योगदान दिले ते वाखाणण्याजोगे होते.
आपले मनोगत व्यक्त करताना अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी म्हणाले की कोणतीही गोष्ट साध्य करताना कठीण परिश्रम आणि त्यासाठी निश्चित केलेले ध्येय या दोन गोष्टी प्रामाणिकपणे व मन लावून केल्या की अशक्य नसतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कुमारी गौरी पिसे व रोहित नामदास अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या कर्तुत्वाने आपल्या आई वडिलांचे, समाजाचे व आपल्या तालुक्याचे नाव उज्वल केले. खरतर हा सत्कार त्यांचा नसून हा आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आहे.
माण तालुका हा पाण्याने दुष्काळी जरी असला तरी की रत्नाची खाण आहे त्या खाणी मध्ये प्रत्येक जण हिरा आहे गरज आहे ती त्यांना पैलू पाडायची सौ वनिता पिसे व विलास नामदास या पालकांनी या दोन्ही यांना खऱ्या अर्थाने पैलू पाडला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.सत्कारमूर्ती च्या भाषणात बोलताना कुमारी गौरी पिसे म्हणाले की मी लहानपणी परीक्षेत पास झाल्यानंतर माननीय नितिन काका यांनी माझ कौतुक केलं होतं आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितले होते की तू खूप मोठी होशील आणि खरंतर त्यांच्या या कौतुकाने त्यांच्या या शाबासकी ने पुढे काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली आणि मी आज या पदावर विराजमान आहे. खरंतर नितिन काकां सारखी लोक या समाजात असन खूप गरजेचे आहे कारण एखादी गोष्ट यशस्वी झाली आणि त्यांना शाबासकीची थाप भेटली की पुढे आणखी मोठी झेप घेण्याची जिद्द निर्माण होते यासाठी मी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देते.
सत्कार मूर्तीच्या भाषणात बोलताना कुमार रोहित नामदास म्हणाले की मी दहावी मध्ये ज्या वेळी पहिला नंबर मिळवला त्यावेळी नितिन दोशी साहेबांनी माझा सत्कार घेतला होता आणि हा सत्कार माझ्या कारकिर्दीला कलाटणी देऊन गेला कारण दहावी मध्ये पहिला नंबर मिळाल्या नंतर सत्कार झाला त्यामुळे मी पुढे जाऊन काहीतरी करून दाखवावे अशी माझ्याकडून जणू त्यांनी शपथच घेतली त्यामुळे आज मी जे उद्दिष्ट साध्य करू शकते त्यामागे नक्कीच नितिन दोशी साहेब यांचा मोलाचा वाटा आहे असे मी म्हणतो.एमपीएससी च्या पुणे विभागातून मागासवर्गीय गटातून माझा पहिला नंबर आला त्यावेळी मला कोणतेही खाते भेटत असताना सुद्धा माझ्या माण सारख्या दुष्काळी भागात पाण्याची प्रचंड टंचाई आहे या तालुक्यात इथल्या शेतकऱ्यांना जर मी पाणी देऊ शकलो या भागात नक्कीच नंदनवन फुलेल अशी मला आशा आहे, म्हणून मी जलसंपदा हे खाते निवडले, कारण खडकाळ जमिनीत सुद्धा येथील शेतकरी राजा पिके घेऊ शकतो तर पाणी आल्यानंतर येथील शेतकरी नक्कीच सुखी आणि समृद्ध होईल.या कार्यक्रम प्रसंगी माणदेशी महिला बँकेच्या संचालिका सौ राजश्री दोशी ,म्हसवड चे माजी नगराध्यक्ष सुरेश म्हेत्रे, जालिंदर पिसे, विलास नामदास सर, संस्थेचे संचालक अभिराज गांधी, सोमेश्वर केवटे, अहिंसा पतसंस्थेचे व्यवस्थापक उपव्यवस्थापक
कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले तर प्रास्ताविक निरज व्होरा यांनी केले.


