




✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.11मे ):-रक्तसाठा कमी असल्याने रुग्णाची गैरसोय होत आहे.उन्हाळा सुरू असल्याने रक्तदात्यांची संख्या कमी भासत आहे, म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून आपण राजकीय पक्ष, समजिक संस्था व युवक वर्ग या अश्या संघटनानी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रुग्णाचे प्राण वाचवावे.त्यामुळे नियमित गंभीर रुग्णांना रक्त पुरवठा करणे शक्य होईल.कारण रक्ताची मागणी खूप वाढली असल्यामुळे ब्लड बँकमधे रक्त साठा कमी दिसून येत आहे.
रक्तदात्यांची संख्या उन्हाळा असल्यामुळे खूप कमी दिसत असल्यामुळे ब्लड बँक मधे दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा भासत आहे.वेळीच रक्त न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांना आपल जीव देखील गमवावा लागतो. हे सर्व परिस्थिती बघता रक्तमित्र विकास बोरकर (स्वप्नपूर्ती रक्त सेवा) तर्फे युवकांना आव्हान करतात की, सर्वांनी समोर येऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावे. असे आव्हाहन रक्तमित्र, स्वप्नपूर्ती रक्त सेवा द्वारे करीत आहेत




