Home Breaking News तलाठ्यांनी त्यांच्या सज्ज्यावर उपस्थीत राहावे- पत्रकारांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

तलाठ्यांनी त्यांच्या सज्ज्यावर उपस्थीत राहावे- पत्रकारांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

229

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.10मे):- ब्रह्मपुरी येथील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने द्वारे तलाठी सज्जावरील तलाठ्यांच्या उपस्थितीबाबत
उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना 6 मे ला निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनामध्ये तलाठी आपल्या सज्जावर उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून महसुल विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 6 जानेवारी 2017 ला परिपत्रक निर्गमित केलेले आहे मात्र यावर अंमलबजावणी योग्य प्रकारे होताना दिसत नसल्याने सदर पत्रकाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी याकरिता पत्रकारांच्या शिष्टमंडळ द्वारे निवेदन देण्यात आले असून निवेदनामध्ये

जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो . परंतू तलाठी हे कार्यालयात उपस्थित रहात नसल्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे . जनतेकडून तलाठी कार्यालयांशी संबंधित विविध तक्रारवजा सूचना शासनाकडे प्राप्त होत आहेत. जनतेस आवश्यक त्या सेवा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कार्यालयामध्ये तलाठी उपस्थित असणे अत्यंत आवश्यक आहे . त्यास्तव खालील सुचनांचे पालन करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरुन सर्व तलाठी कार्यालयांना देण्यात याव्यात ,

संबंधित तलाठ्यांनी त्यांचा नियोजित दौरा / बैठका याबाबत कार्यालयाच्या आवारात सूचना फलक लावावा .संबंधीत तलाठी यांनी कार्यालयाच्या आवारात तलाठ्यांची कर्तव्ये / जबाबदाऱ्या याबाबत फलक लावावा .तलाठ्यांनी आपला दुरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ठळक दिसेल, अशा स्वरुपात कार्यालयाच्या आवारात लावावा, तसेच लगतचे संबंधित मंडळ अधिकारी व नायब तहसिलदार यांचे नांव दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक सुध्दा दर्शविण्यात यावेत.

ज्या सज्जांच्या ठिकाणी तलाठी / मंडळ अधिकारी यांना शासनाने निवासस्थाने उपलब्ध करुन दिली आहेत, त्यांनी त्या निवासस्थानामध्ये राहावे.सेवा हमी कायदयाअंतर्गत नमूद सेवा विषयक बाबीची ( विविध प्रकारचे उतारे , लागणारा कालावधी इ. तपशील ) माहिती कार्यालयाच्या आवारात लावावी .तलाठी यांनी शेतजमीनी , पिकपहाणी करताना संबंधित शेतजमीनीस भेटीबाबतचा तपशील जाहीर करावा.

तलाठी कार्यालयामध्ये खाजगी व्यक्तींना कार्यालयीन कामकाजा करिता ठेवू नये , असे करणाऱ्यांविरुध्द शिस्त भंगाची कारवाई करण्यात यावी .विविध दाखले देताना , शासनाने आकारलेले वाजवी शुल्क याबाबतची दरसुची कार्यालयाच्या आवारात लावावी .अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Previous articleआष्टीत लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद -२१५ प्रकरणे निकाली
Next articleशासकीय रक्तपेढ्यामधे रक्ताची टंचाई पाहता युवकांनी रक्तदानासाठी समोर यावे- रक्तमित्र विकास बोरकर यांचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here