Home महाराष्ट्र जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही तोवर लढा चालूच ठेऊ:-खूपसे पाटील

जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही तोवर लढा चालूच ठेऊ:-खूपसे पाटील

210

🔸शेतकऱ्यांचा आक्रोश हे लोकप्रतिनिधी चे अपयश

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल( दि.10मे):-दहिगाव उपसा सिंचन योजना जी युतीच्या काळात मंजूर झाली .आणि ती सुरू व्हायला पंधरा ते सतरा वर्षाचा कालावधी गेला आणि ती योजना सुरु होऊन देखील ज्या 29 गावासाठी योजना सुरू झाली होती त्यातील काहीच गावे ओलिताखाली आली आहेत आणि आजही योजना मंजूर होऊन पंचवीस वर्षे झाली तरीही काही भागात या योजनेचे पाणी अजून पोहोचले नाही .

यासाठी सर्व शेतकरी वर्गाने मिळून आज कुंभेज फाटा येथे आंदोलन ठेवले होते .त्या आंदोलनात या योजनेतील एकोणतीस गावांपैकी घोटी ,वरकुटे ,निंभोरे ,आळसुंदे ,साल्से या गावांतील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .या आंदोलनात जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रमुख माननीय अतुल भाऊ खूपसे पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते यावेळी या योजनेतील सर्व गावकरी व शेतकरी यांचा आक्रोश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यां पर्यंत पोचवण्याचं काम जनशक्ती संघटनेच्या प्रमुख अतुल भाऊ खूपसे पाटील यांनी केले. ते बोलताना असे म्हणाले की प्रशासनाने तालुक्याचे आमदार यांच्या संगनमताने पाणी सोडले जात आहे व गट -तट आणि राजकारण करून पाणी सोडले जात आहे तरी माझी लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे किमान पाण्यात तरी राजकारण करू नका आणि संबंधित अधिकाऱ्यांना खूपसे पाटील यांनी खडसावल्यानंतर संबंधित अधिकारी यांनी सर्व गावांना पाण्याचे वितरण समांतर केले जाईल व जोपर्यंत टेल टू हेड सर्व गावांना पाणी मिळत नाही तोवर ही योजना चालूच राहील असेही लेखी स्वरूपात दिले .

पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित करण्यात आले दरम्यान काळात खूपसे पाटील यांनी उजनीचे पाणी इंदापूरला पळून नेल्याची आणि ते परत मिळवण्याची आठवण देखील करून दिली सोलापूर जिल्ह्याच्या पालक मंत्री माननीय दत्तामामा भरणे यांनी सोलापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसले आणि उजनी धरणाचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला पळून नेण्याचा डाव आखला पण तो डाव उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून उधळून लावण्याचे काम केले .उजनीच्या सर्व पाण्याचे वाटप तर झाले आहेच तरी देखील नवीन निविदा तयार करून पाणी पळण्याच्या} काम केलं जातं आहे. गेली पंचवीस वर्ष या योजना मंजूर झालेले आहेत यांना जर पूर्ण दाबाने पाणी मिळत नसेल तर हे करमाळा करांचे दुर्दैव आहे या उजनी धरणासाठी जमिनी करमाळा तालुक्याने दिल्या परंतु तालुक्याला पाणी नाही आणि पाण्याअभावी जर आंदोलन करावे लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवच काय ते .आंदोलन संपल्यानंतर आंदोलन करते व सर्व नियोजन करणारे प्रमुख यामध्ये घोटी गावचे सरपंच सचिन राऊत पाटील वरकुटे गावचे सरपंच दादासाहेब भांडवलकर निंभोरे पंडित तात्या वळेकर जनशक्तीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाबाराजे कोळेकर बाळासाहेब राऊत सुभाष थोरात रामराजे डोलारे किशोर शिंदे बालाजी तरंगे व मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता ठरल्याप्रमाणे जर पाणी नाही सोडले गेले तर याच्यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन दहेगाव सिंचन योजनेच्या कार्यालयासमोर करू असे प्रतिपादन खूपसे पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here