Home पुणे राज्यातील 15 हजार रिक्त जागांची नोकर भरती लवकरच भरणार- दत्तात्रय भरणे

राज्यातील 15 हजार रिक्त जागांची नोकर भरती लवकरच भरणार- दत्तात्रय भरणे

228

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.10मे):–अर्हम फाऊंडेशन व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाची पारदर्शक नोकरभरती, रिक्त जागा व नवीन नोकर भरती याबाबत भूमिका काय ? या विषयावर संवाद कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील नवी पेठ येथील संकल्प मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे उपस्थित होते. यावेळी अर्हम फाऊंडेशन अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया ,वास्तव कट्टाचे किरण निंभोरे,महेश बडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा परीक्षांच्या सध्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत तसेच प्लॅन बी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नोकर भरती विषयी यामध्ये चर्चा करण्यात आली.

दत्तात्रय भरणे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की कोरोनामुळे शासनामधील नोकर भरती रखडली होती त्यामुळे आता 15000 रिक्त जागा लवकरच भरणार आहोत असे आश्वासन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले. आतापर्यंत सुमारे 8000 भरती प्रक्रियेची सुरुवात झाली असून उरलेल्या जागा यांची प्रक्रिया लवकर राबवली जाणार आहे अशी माहिती भरणे यांनी दिली.विद्यार्थ्यांनी फक्त एमपीएससी व यूपीएससी वर अवलंबून न राहता दुसऱ्या क्षेत्रातील करियर प्लॅन बी म्हणून पाहावे असा सल्ला माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. झगडे यावेळी म्हणाले की सध्या आरोग्य विभागासह इतर विभागांच्या परीक्षांचा गोंधळ पाहता या परीक्षा एमपीएससीतर्फे घेण्यात याव्यात. यावेळी एमपीएससी व यूपीएससी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्हम् फाउंडेशन व वास्तव कट्टा तर्फे हा तिसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या संवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयन गुरव यांनी केले. या संवाद कार्यक्रमाची मान्यवरांची प्रकट मुलाखत किरण निंभोरे यांनी घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी दिली. यावेळी विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here