Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,ऑल इंडिया तन्जिम ए इन्साफ व श्रमिक...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,ऑल इंडिया तन्जिम ए इन्साफ व श्रमिक एकता न्युज परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ईद ए मिलाफ

218

✒️नांदेड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुखेड, नांदेड(दि.10मे): सामाजिक सलोखा, त्याग आणि शांतीचा संदेश देणारे मुस्लिम बांधवांचे महत्वाचे दोन सण म्हणजे ईद उल फितर आणि ईदुज्जुह. यातला ईद उल फितर हा आनंदाने साजरा करणारा सण आहे. एकमेकांमधे बंधुभावाचे नाते स्थापीत व्हावे आणि प्रेमाने आनंदाने साजरा होणारा असा हा उत्सव आहे. ईदचा अर्थ आनंद व फितर म्हणजे दान करणे. हे दान अन्नाच्या स्वरूपात असावे असा नियम आहे. रमजान च्या महिन्यात मुस्लिम बांधव संपुर्ण महिनाभर रोजे ठेवतात. जसजशी ईद जवळ येऊ लागते मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडुन वाहतांना दिसतो.
रमजानच्या पवित्र महिन्यात चंद्र दर्शन होईपर्यंत रोज उपवास केले जातात. सुर्य उगवण्यापुर्वी अन्नाचे ग्रहण करायचे आणि संपुर्ण दिवस सुर्यास्त होईपर्यंत उपवास पाळायचा. सुर्यास्त झाल्यानंतर नमाज करून प्रार्थना करायची आणि उपास सोडायचा. असा हा नियम संपुर्ण महिनाभर पाळायचा. या पवित्र दिवसांमधे कुराण शरीफ ग्रंथाचे वाचन करायचे. वाचन केल्यानंतर चिंतन मनन केले जावे असा नियम आहे.

बंधुभावाचा हा सण शत्रुला देखील जवळ करा असा संदेश प्रवाहीत करतो. या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह वा मशिदीत नमाज अदा करण्याकरता एकत्र येतात. अल्लाहा प्रती नमाज अदा केली जाते व त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा देतात. त्याच अनुषंगाने काल दि. ८ मे २०२२ रोजी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी.आंबेगावे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, यांच्या मार्गदर्शनानुसार मुखेड तालुकाध्यक्ष आसद बल्खी यांच्या निवासस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मुखेड,ऑल इंडिया तन्जिम ए इन्साफ व श्रमिक एकता न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने ईद-ए-मिलाफ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे, किरण वाघमारे (राईटर पो.स्टे.मुखेड), ए.पी.आय बोथगिरे, पी.एस.आय. फड, पी.एस.आय. जाधव संपादक जय-भीम सोनकांबळे, पत्रकार विजय बनसोडे,पत्रकार बबलू शेख इमरान आतार, एस.के बबलू, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा सचिव तथा स्वाभिमान भारत न्यूज चे संपादक भारत सोनकांबळे, तालुका कार्याध्यक्ष मोतीपाशा पाळेकर,पत्रकार मेहताब शेख,खाजाभाई धुंदी, आदींसह सामाजिक राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची सांगता सिरखुर्रमा सह स्नेहभोजनाने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here