Home महाराष्ट्र नाशिक मुक्त विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांना नाव नोंदणीचे आवाहन

नाशिक मुक्त विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांना नाव नोंदणीचे आवाहन

262

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.9मे):- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 27 वा दीक्षांत समारंभ 17 मे 2022 रोजी विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयात सकाळी 11.00 वाजता होणार आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील https://convocation27.ycmou.ac.in या लिंकवर दिनांक 08 मे 2022 पर्यंत आपली नावे नोंदविण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केले आहे.या दीक्षांत समारंभात 2020-21 च्या वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे.

या समारंभात सालाबादप्रमाणे पदवी, पदविका, पदव्युत्तर पदविका, पीएच.डी. पदवीचे प्रदान केले जाणार आहे. कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छीणारे जे विद्यार्थी विद्यापीठात उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी नोंदणी करतील, त्यांनाच विद्यापीठात या दिवशी प्रमाणपत्र दिले जाईल, बाकी सर्व विद्यार्थ्याचे पदवी प्रमाणपत्र समारंभानंतर त्यांच्या अभ्यासकेंद्रावर यथावकाश पाठवले जातील, ती विद्यार्थ्यांनी आपापल्या अभ्यासकेंद्रावर जाऊन प्राप्त करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्यावी असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here