Home महाराष्ट्र श्री संत सावता माळी युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चोपडा तहसीलदार...

श्री संत सावता माळी युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चोपडा तहसीलदार यांना निवेदन

157

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि9मे):-11 मे प्रशासकीय स्तरावर *महात्मा दिन* म्हणून साजरा करावा यासंदर्भात निवेदन तहसीलदार अनिल गावित साहेब यांना देण्यात आले.

महाराष्ट्र भूषण लोकनेते संस्थापकअध्यक्ष सचिनभाऊ गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व फुलेप्रेमींना श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या कडून आवाहन करण्यात आले होते की, ११ मे “महात्मा दिन” साजरा करण्यात यावा कारण ११ मे १८८८ रोज़ी ज्योतीबा फुलेंना “महात्मा” ही पदवी लोकांनी बहाल केली होती. दलित आणी निराधारांना न्याय मिळावा या करीता ज्योतीबांनी ‘ सत्यशोधक समाज’ चीं स्थापना केली. त्यांची समाजसेवा पाहुन *११ मे १८८८ रोज़ी मुंबई येथे एका विशाल सभेत लाखोंच्या उपस्थितीत त्याना “महात्मा” ही पदवी बहाल करण्यात आली.* ज्योतीबा फुले यांना त्यांनतरच “महात्मा ज्योतीबा फुले” या नावाने जगभरात ओळखले जाऊ लागले . *‘महात्मा’ ही पदवी लोकांकडुन, जनतेकडुन प्राप्त करनारे संम्पुर्ण जगात “महात्मा फुले” हे पहीले समाजसुधारक आहेत.* म्हणुनच “महात्मा दिनास” महत्व आले आहे.

आधुनिक भारतातील पहिले समाजक्रांतीकारक म्हणुन त्यांना ओळखले जाते. त्यांनी ब्राम्हण – पुरोहित यांच्याशिवाय विवाह संस्कार सुरु केले. आणि यास मुंबई हायकोर्टाची मान्यता सुद्धा मिळवली . तसेच मराठीत मंगल अष्टके सुद्धा लिहीली.ते बालविवाह विरोधात आणी विधवा विवाहाचे समर्थक होते. आपल्या जिवनाच्या कार्यकाळात त्यांनी भरपुर पुस्तकें लिहीली. जसे तृतीय रत्न , छत्रपती शिवरायांचा पवाडा, शेतकर्यांचा आसुड, गुलामगिरी, आदी. महात्मा फुलेंनी केलेल्या एकत्रित संघर्षामुळे सरकारला अँग्रीकल्चर अँक्ट पास करावा लागला होता. सन १८४८ मध्ये भारतातील पहीली मुलींची शाळा , भीडेवाडा , पुणे येथे काढली.आणी पत्नी सावित्रीबाई फुलेंना भारतातील पहील्या शिक्षिका तसेच मुख्याध्यापीका बनविले.
शिवजयंतीचे जनक, तसेच आंबेडकरांचे गुरु हे महात्मा फुले आहेत. त्यामुळेच शिवजयंती, आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंतीप्रमाणेच *“महात्मा दिन” साजरा केला जावा, याकरीता श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य ही संघटना २०१६ पासुन प्रयत्न करत आहेत.* मागील वर्षी ११ मे रोज़ी महाराष्ट्रातील सुमारे १८ जिल्ह्यांत “महात्मा दिन” साजरा केला गेला.

प्रशासकीय स्तरावर सुद्धा महात्मा दिन साजरा करण्यात यावा या आशयाचे निवेदन तहसीलदार चोपडा यांना देण्यात आले.
त्याप्रसंगी उपस्थित खान्देश विभागीय संपर्क प्रमुख समाधान माळी सर जिल्हाध्यक्ष महेंद्र महाजन जिल्हा उपाध्यक्ष अल्केश महाजन जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र महाजन सर शहर अध्यक्ष रोहित माळी राजेंद्र माळी दिपक माळी समवेत सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleशेतकरी पीक कर्जावर क्रांतिकारी निर्णयकर्ते!*
Next articleनाशिक मुक्त विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांना नाव नोंदणीचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here