




🔸नेत्र रुग्णांची तपासणी सह ऑपरेशनचे नियोजन
✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)
कुरुल(दि.8मे):- लोकनेते शुगर चे चेअरमन युवक नेते माननीय बाळराजे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुरूल येथे आज महाआरोग्य शिबिर संपन्न.या शिबिराचे उद्घाटन मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने यांच्या हस्ते तर माजी आमदार राजनजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले,यावेळी लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील पंचायत समिती सदस्य युवानेते अजिंक्यराणा पाटील राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश भाऊ चवरे जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दिपक माळी, अनिल कादे गुरुजी, बाजार समितीचे सभापती असलम चौधरी, पंचायत समिती सदस्य जालिंदर लांडे, प स सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, भारत भाऊ सुतकर, दिलीप पाटील लोकनेते चे संचालक काका पवार शुक्राचार्य हावळे, संभाजी राजे चव्हाण प्रशांत बचुटे आदी उपस्थित होते.
शिबिरा प्रसंगी राजनजी पाटील यांच्या कन्या डॉक्टर विनिता गोरे डॉक्टर विशाखा फाळके या आवर्जून दिवसभर उपस्थित होत्या
या शिबिरामध्ये ४५२३ रुग्णांची तपासणी करण्यात आली,यामध्ये मधुमेह हृदय रोगी त्वचारोग अस्थीरोग मूत्ररोग,जनरल आजार’मेंदू रोग किडनी वरील आजार,पोट विकार स्त्रियांचे आजार,बालकांची तपासणी या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात आल्या.या महाआरोग्य शिबिर मध्ये डॉक्टर हरणमारे यांच्या नेतृत्वाखालील नेत्र डॉक्टरांनी उच्चांकी रुग्ण तपासणी केली असून ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज आहे. अशा रुग्णांची ऑपरेशन करण्याचे आयोजन केले आहे.
या शिबिरामध्येडॉ निर्मल तापडिया, डॉ प्रसाद केळकर, डॉ निशिकांत मस्के, डॉ विषाल गोरे डॉ अमजद सय्यद डॉ गिरीश काळे ,डॉ महेश तळपल्लीकर, डॉ भास्कर पाटील, डॉ संदीप कादे, डॉ शैलेश पाटील ,डॉ कुंदन चोपडे, डॉ निखिल नवले आधी सोलापुरातील नामवंत डॉक्टर आदी मान्यवरांसह इतर विषय तज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी,नागरिक व मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




