Home महाराष्ट्र मनोहर भिडेला क्लिनचीट व पवारांची राजकीय भूमिका!

मनोहर भिडेला क्लिनचीट व पवारांची राजकीय भूमिका!

217

जगजाहीर भिमा कोरेगांव येथे विजयी शौर्य स्तंभ परिसरात झालेल्या हिंसाचाराची कल्पना सर्वांना आहे.ती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मनोहर भिडे व समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी पध्दतशीर घडवून आणली.व त्याला तत्कालीन भाजपच्या फडणवीसपंत सरकारची अप्रत्यक्ष अभद्र साथ लाभली.हे काही लपून राहिले नाही.त्याला तसा तत्काळ दुजोरा शरद पवार यांनी ट्विट करून केला होता.हे सुध्दा विसरता येणारे नाही.तेव्हा ट्विटरवर काय म्हणाले होते पवार “भीमा-कोरेगांवच्या लढाईला २०० वर्षं झाल्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील ही कल्पना होतीच. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून येऊन तीन चार दिवसांपासूनच चिथावणी देण्याची भूमिका घेतल्याचे वढू येथील ग्रामस्थ सांगत आहेत.” पवारांना आमचा प्रश्न आहे,त्या हिंदुत्ववादी संघटना कोणत्या? अर्थात जगजाहीर आहे,मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या ‘त्या’ हिंदुत्ववादी संघटना होत्या.तरी पवार साहेबांच्या महाविकास आघाडी सरकारचे पोलिस न्यायालयात व चौकशी आयोगापुढे या दंगली संबंधी भिडे विरोधात पुरावे नाहीत.असे स्पष्ट करीत त्याला क्लिनचीट देत असतील तर कुठे तरी भिडे-पवारात पाणी मुरळे आहे. असेच म्हणता येईल.

या संदर्भात ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर केलेला आरोप अतिशोक्त नाही.जयंत पाटलामुळे भिडेला क्लिनचीट मिळाली.असा तो आरोप आहे.त्याला तेव्हाची तशी संशयास्पद पार्श्वभूमी आहे. दंगली नंतर अशी माहिती पुढे आली होती, समस्त हिंदू आघाडीचे नेते व दंगलीचे प्रमुख आरोपी मिलिंद एकबोटे व सहकारी दंगलीच्या एक-दोन दिवसांपूर्वी पुण्यात रात्रीच्या सुमारास जयंत पाटील यांना भेटले.त्यांच्याशी बैठक केली.अशी आणखी एक बातमी आहे.जयंत पाटील यांच्या आईच्या अस्थिविसर्जनात मनोहर भिडे हे सांगलीत सहभागी झाले होते.पाटील हे सांगलीचेच! अर्थात मनोहर उर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे या हिंदुत्ववादी संघटनांचे नेते व राष्ट्रवादी पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे कुठेतरी आपसी संबंध आदळून येताना दिसतात.त्यामुळे या प्रकरणाची सुरु; पटेल चौकशी आयोगापुढे साक्ष देताना शरद पवार अप्रत्यक्ष सांगतात, दंगलीला तत्कालीन फडणवीस सरकार जबाबदार राहिली आहे.अशा त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत.पण पवार येथेही राजकारणी ढंगाने बोलत कदाचित आपल्या जयंत पाटलांच्या संशयास्पद वागणुकीवर पडदा घालण्याचा प्रयत्न करीत असावेत.

हे सत्य आहे,
भिमा कोरेगाव दंगल वा हिंसाचार कसा घडून येईल,असे षडयंत्र आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंत यांनी रचले होते.त्यासाठी त्यांनी भिडे, एकबोटे यांना रसद पुरविल्याचे म्हटल्यास नाकारता येणार नाही.त्यात शरद पवारांचे विश्वासू जयंत पाटील यांचा सहभाग त्यांच्या तेव्हाच्या हालचाली बघून नाकारता येणार नाही.त्यासाठी त्यांनी पार्श्वभूमी ही जवळच्या वढू गावातील संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड या दोघांच्या समाधी स्थळांची घेतली.इतिहास आहे, छत्रपती संभाजी राजे यांची भटांनी षडयंत्र रचून अत्यंत क्रूरपणे हत्या घडवून आणली होती.आणि त्यांच्या देहाचे तुकडे नदीत फेकले होते.ते एकत्र करण्याचे धाडस वढू गावचा महार गोविंद गोपाळ गायकवाड यांनी केले.छत्रपती संभाजी राजे यांचा देह एकत्र जोडून सन्मानाने अंत्यसंस्कार केला व त्या जागेवर महाराजांची समाधी उभी केली.त्यावरुन मृत्यू नंतर गोविंद गायकवाड यांचीही समाधी आठवण म्हणून उभारल्या गेली.त्यांच्या नामफलका वरुन गावात काही किंतोकांनी वाद निर्माण केला होता.त्याला हवा देण्याचे काम भिमा कोरेगाव विजयी शौर्य दिनाच्या द्विशताब्दी वर्ष पर्वाच्या पार्श्वभूमीवर देण्याचा प्रयत्न ब्राह्मण्यवादी पेशवाईच्या संघी औलादीने चालविला.त्यातील एक शेंडी-जाणवेधारी स्वयंसेवक हा भिडे राहिला आहे.तर एकबोटे सुध्दा संघ संबंधित गडी आहे.

सर्वांना ज्ञात आहे, भिमा कोरेगाव येथील विजयी शौर्य स्तंभ हा पेशव्यांशी झालेल्या युध्दात ज्या सैनिकांनी अपार शौर्य गाजवून पेशवाईचा दारुण पराभव केला,अशा सैनिकांच्या सन्मानार्थ इंग्रजांनी उभारला आहे.त्याला मानवंदना देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटी पासून महार समाज मोठ्या संख्येने १ जानेवारी रोजी गोळा होतो.ही मानवंदना ब्राह्मणांना आपल्या दारुण पराभवाची आठवण करुन देत अपमानजनक वाटते.ती द्वेष भावना सत्तेत आलेल्या फडणवीस यांच्यात ही होती.जेव्हा ते मुख्यमंत्री झाले,तेव्हा संघाच्या कुण्या एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली होती,दोनशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा आमची पेशवाई आली आहे.

पेशावाई म्हणजे बहुजनांवर जुलूम,अन्याय,अत्याचार ! त्यांची अस्मिता ओरबाडून टाकणे.हा इतिहास पवारी टोळीने वाचला की नाही,आम्हाला कल्पना नाही.कदापि वाचला असता तर शरद पवार यांनी एका ठिकाणी रामदासा सोबत शिवाजी महाराजांचा असलेल्या पुतळ्याचे अनावरण केले नसते.खोलेबाई कडून मराठा जाधवबाईचा जातीय अपमान सहन केला नसता.भिडे व एकबोटे अशा संघाड्यांना पुण्यात उफाळून आणले नसते.दोनदा फडणवीस पंताचे सरकार आणण्यासाठी छुपी मदत केली नसती. काय करणार त्यांची सत्तांधाने मराठा अस्मिता पार ठार मरुन गेली आहे.परिणाम असा आज पेशवाईची ओलांद मराठ्यांना आव्हान देत आहे.भिडे हे राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाडावर चालून गेले होते.पंढरपूरच्या यात्रेत जून २०१७ मध्ये वारकऱ्यांवर हल्ला चढवण्या पर्यंत मजल गाठली होती.त्यापूर्वी २००९ मध्ये जोधा-अकबर या चित्रपटाच्या विरोधात हिंसाचाराचे तांडव घालण्याचा प्रयत्न भिड्याने केला होता.तशीच पार्श्वभूमी ही मिलिंद एकबोटे यांची आहे. भिमा कोरेगाव येथील शौर्य विजय स्तंभाला १ जानेवारी २०१८ रोजी द्विशताब्दी वर्ष दिनानिमित्त देशभरातील आंबेडकरी जनता लाखोंच्या संख्येने मानवंदना देण्यास येईल.याची जाणीव सर्व नाक,कान डोळे असलेल्या फडणवीस पंत सरकारला नसेल,असे होत नाही.आणि त्या निमित्ताने त्या भागात जनवातावरण भडकविल्या जात आहे.याचीही माहिती असणार.तरी सरकार कडून कोणतीही उचित व्यवस्था करण्यात आली नाही.आदल्या दिवसा पासून भिमा कोरेगाव मध्ये सर्वत्र बंद पाळण्यात आला होता.तेथे येणाऱ्या लोकांची खाण्या-पिण्याची एकप्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न झालेला असताना स्थानिक नगरपालिका,राज्य सरकार व पोलीस खाते सुविधा व सुरक्षा पुरविण्यास अक्षम्य दुर्लक्ष करीत असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे,त्या सर्व यंत्रणा ह्या हिंसाचाराच्या षडयंत्रात सहभागी होत्या.त्याला शरद पवारांचा राष्ट्रवादी ही अपवाद राहिला नाही.पुणे जिल्हा तर पवारांचा गृह जिल्हा आहे.म्हणून दंगली नंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या सकाळी शरद पवार ट्विट करतात,या हिंसाचाराला हिंदुत्ववादी संघटना जबाबदार आहेत.म्हणजे पवारांना आदल्या पासून भिमा कोरेगावात काय शिजत आहे,याची पुरेपूर कल्पना होती.आज ते म्हणतात मी भिडे, एकबोटेला ओळखत नाही. हे हास्यास्पद आहे.ते हिंसाचाारातील मोठ्या माशाला वाचविण्याचा प्रयत्न आहे.
‌ कदापि १ जानेवारी २०१८ रोजी राज्यभरातून मानवंदनेसाठी आलेल्या मोठ्या संख्येतील समता सैनिक दलाच्या युवक-युवतींचे पथसंचलन होवून त्यांनी मोर्चा सांभाळला नसता तर त्या सुनियोजित हिंसाचारात बौध्द आंबेडकरी लोकांच्या रक्ताचे पाट वाहिले असते.हे सर्व काही रामदास आठवले,प्रकाश आंबेडकर व लोकांच्या लक्षात आले.त्यांनी हिंसाचारासाठी भिडे, एकबोटे यांना जबाबदार धरले व त्यांच्या अटकेची मागणी केली. मंगळवारी संध्याकाळी पुण्यातील पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये अनिता साळवे व तिची मैत्रीण अंजना गायकवाड यांनी कोरेगाव भीमा शौर्यदिननिमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेले असता सदर घटना (दंगल) या संभाजी भिडे, शिवजागर प्रतिष्ठान प्रमुख, मिलिंद एकबोटे, हिंदू जनजागरण समिती प्रमुख व त्यांच्या सवर्ण साथीदारांनी घडवून आणलेला आहे हे आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पहिले आहे, असे म्हटले आहे.असाच दावा वढू व परिसरातील लोकांनी केला आहे.साळवे, गायकवाड या महिलांच्या फिर्यादीनंतर ‘शिवप्रतिष्ठान’चे संभाजी भिडे आणि ‘समस्त हिंदू आघाडी’चे मिलिंद एकबोटे यांच्यावर ॲट्रोसिटी ॲक्ट आणि दंगल घडवणे या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.आंबेडकरी समाजाचे आक्रमक रुप बघीतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसाने न्या.पटेल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची घोषणा केली.असा सारा घटनाक्रम आहे.आज शरद पवारांचे सरकार मनोहर भिडेला क्लिनचीट देत असेल तर हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.पवार साहेब काय मानवंदनेसाठी आलेले उत्सवी आंबेडकरी जनतेनी तेथे हिंसाचार घडवून आणला का ? याचा खुलासा महाविकास आघाडी सरकार कडून झाला पाहिजे.पवार म्हणतात,तेथील हिंसाचाराला तत्कालीन फडणवीस सरकार जबाबदार आहे.मान्य आहे तर मग तुमचे गेल्या अडीच वर्षांपासून असलेले सरकार अजून पर्यंत चौकशी करून का दोषींवर कारवाई करती झाली नाही ?पवार,ठाकरे व कांग्रेस हे पक्ष व त्यांची सरकार ही मनुवादाची अनौरस पैदास आहे.म्हणून अशी टोळवाटोळव होत आहे.तशीच टोलवाटोलवी ओबीसींशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणावरून केली जात आहे.हे मागासवर्गीयांनी समजून घेत भाजप बरोबर कांग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला नाकारत आपले राजकीय स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले पाहिजे.तसे केल्या शिवाय पर्याय नाही.

✒️मिलींद फुलझेले(नागपूर.संपादक दैनिक “बहूजन सौरभ)मो:-७७२१०१०२४७

Previous articleपूर्व उपनगरातील पूरपरिस्थितीवर उपाय : पूर्व द्रूतगती महामार्गाखाली १० नाल्यांचे होणार रुंदीकरण
Next articleवेंगुर्ला नगरपरिषदेने कंत्राट वेळेवर नूतनीकरण न केल्यामुळे कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here