Home महाराष्ट्र डोळांना केवळ सुंदरच पाहण्याचा मोह आवरा:-बांगरे महाराज

डोळांना केवळ सुंदरच पाहण्याचा मोह आवरा:-बांगरे महाराज

275

🔸तडस परिवार आयोजित भव्य भागवत सप्ताह

✒️सिंदी रेल्वे प्रतिनिधी(मोहन सुरकार)

सिंदी रेल्वे(दि.8मे):-मानवी शरिराच्या पाच इंद्रीयावर ज्याने नियंत्रण मिळविले ते महान झाले. आज वेगळाच प्रकार दिसतो इंद्रियांवर नियंत्रण मिळविने तर दुर डोळ्याना फक्त सुंदरच पाहण्याचा मोह जडलाय. आई-वडील सुंदर पाहीजे बायको पोरबाळ सुंदर पाहीजे घरदार सुंदर पाहीजे गाडीघोडी नौकरी चाकरी सारंकही सुंदरच पाहण्याचा मोह काही थांबत नाही.त्यामुळे डोळ्यांनी वाईट काही पाहु नये म्हणण्यापेक्षा सुंदर पाहण्याचा मोह आवरुन वास्तविकता स्विकारण्याची आजच्या समाजाला नितांत गरज असल्याचे भागवतकार बांगरे महाराज म्हणाले,ते शहरातील हार्डवेअर व्यवसायीक तडस परिवाराच्या वतीने आयोजित भागवत कथेतील गोवर्धन पुजनाच्या दिवशी शुक्रवारी (ता. ६) प्रवचन करतांना बोलत होते.

सविस्तर वृत्त असे की शहरातील समाधान हार्डवेअर व्यवसायीक तडस परिवारावर कोरोना महामारीत दुःखाचा डोंगरच कोसळला….हसत्या खेळत्या परिवारातील एकाच घरातील समाधान हार्डवेअर चे संस्थापक मालक गंगाधरराव तडस त्यानंतर त्यांचा मोठा मुलगा महसुल मंडल अधिकारी सेलु दत्तात्रय गंगाधरराव तडस त्यानंतर सर्वात लहान मुलगा सामाजिक कार्यकर्ते हेमंत गंगाधरराव तडस या तिघांचा सलग पंधरा पंधरा दिवसाने कोरोनाने मृत्यू झाला. काळाने या परिवारावर फारमोठे संकटच कोसळवले.

परिवारातील तीन तीन कर्ते पुरुष असे वेळे आधी अपघाती मृत्यू पावने या सारखे दुःखते काय?परिवाराचे आद्य गुरुवर्य पंढरपूर निवासी बांगरे महाराजानी सुचविल्यानुसार तडस परिवारातर्फे मृतक आत्म्यास चिर शांती मोक्ष प्राप्त होण्यासाठी सोमवारी ता. २ ते रविवार ता. ८ दरम्यान भव्य संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.भागवत कथेतील एक एक पुष्प गुंफतांनी आपल्या सुंदर वाणीतुन बांगरे महाराज उच्च कोटीचे मार्गदर्शन करीत आहेत.भागवताचे सादरीकरन ऐवढे श्रावणीय आहे की सिंदी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे साहेबाना सुध्दा ऐकण्याचा मोह आवरला गेला नाही ते सहपरिवार नियमीत उपस्थित असतात.आयोजित भागवत तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा सर्व भावीभक्तानी लाभ घेण्याचे आवाहन तडस परिवारातर्फे शाम तडस, संजय तडस, गणेश तडस, किशोर तडस, सुर्यभानजी तडस, तेलरांधे भाऊजी, रंजना तेलरांधे , नितीन फटींग, आदीनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here