Home चंद्रपूर शिक्षक समस्या निकाली काढण्यासाठी २३ मे ला पुरोगामीचे धरणे आंदोलन

शिक्षक समस्या निकाली काढण्यासाठी २३ मे ला पुरोगामीचे धरणे आंदोलन

230

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.8मे):-महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती प्राथमिक शिक्षक तसेच विद्यार्थी हितासाठी सदैव कार्यतत्पर असून , अन्यायाची चीड व न्यायाची चाड बाळगत प्रशासनाशी सनदशीर मार्गाने लढा देत आलेली आहे . अशा पुरोगामी संघटनेचा कार्यकारिणी विस्तार अध्यक्ष किशोर आनंदवार , सरचिटणीस संजय चिडे , कार्याध्यक्ष गंगाधर बोढे , कोशाध्यक्ष सुनील कोहपरे ,महिला मंच अध्यक्ष विद्या खटी , सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे , कोष्यध्यक्ष लता मडावी , जिल्हानेते नारायण कांबळे व सुनीता इटनकर , संघटक दीपक वऱ्हेकर , ज्ञानेश्वरी वानखेडे यांनी उपस्थित सदस्यांच्या समोर जाहीर केला . यावेळी भूतपूर्व अध्यक्ष तसेच सरचिटणीस रवी सोयाम यांनी नवीन कार्यकरिणीकडे पदभार सोपवला .

नवीन कार्यकारिणीच्या पहिल्या सभेत उन्हाची दाहकता लक्षात घेऊन प्रशासनाने शिक्षकांवर उन्हाळी सुट्यात लादलेल्या उपक्रमातून शिक्षक मानसिक ताणतणावाला बळी पडू नये यासाठी २३ मे २०२२ ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना धरणे आंदोलन करणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले . प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्याबरोबर प्रशासनातील गोंधळ याबद्दल आवाज उठविण्यास संघटना आक्रमक असून सर्व सनदशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यास कटिबद्ध असल्याचे प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here