Home महाराष्ट्र टेकामांडवा ते पुडियाल मोहदा रस्त्याच्या कामात अनियमितता?

टेकामांडवा ते पुडियाल मोहदा रस्त्याच्या कामात अनियमितता?

252

🔸संबंधित बांधकाम विभाग व कंत्राटदाराच्या मिलीभगत मुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

🔹जिवती तालुक्यातील नविन रस्त्याच्या कामात मालसुतो योजना जोमात-पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कोमात

✒️सय्यद शब्बीर जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.7मे):-तालुका आदिवासी अतिदुर्गम नक्षल भाग असुन तालुक्याचा विकास करण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व अनेक योजना राबविल्या जात असून विकासासाठी शासन कोट्यवधी निधी मंजूर करून संबंधित विभागाला देत आहे तालुक्यात या योजनेच्या माध्यमातून अनेक रस्त्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराची किड लागली असल्याचे दिसून येत आहे.टेकामांडवा ते पुडियाल मोहदा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीतून सुरु आहे, हे काम त्रिमूर्ती कंट्रक्शन कंपनी गोंदिया करत आहे. परंतु हे कंपनी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करत आहे.रस्त्यावरची माती मुरुम स्प्रेरे मशिन व तार ब्रशने साफसफाई करून डांबरीकरण करावे लागते परंतु तसे न करता खराट्याने झाडून डांबरीकरण करत असल्याचे दिसून येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी काम बंद करून संताप व्यक्त केले मातीवर डांबरीकरण करण्यात येत असल्यामुळे त्यावरील खडी व डांबर आत्ताच वेगळे होत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी हा रस्ता उखडला जात आहे.

कंत्राटदाराच्या गलथानपणामुळे व संबंधित विभागाच्या मालसुतो योजनेमुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. आता पावसाळा सुरू होणार म्हणून कंत्राटदार घाई घाई मध्ये नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे, का असा सवाल तालुक्यातील नागरिकांनी केला आहे.रस्त्याचा कामाकडे संबंधित इंजिनिअरचा लक्ष असने गरजेचे आहे मात्र इंजिनिअर व कंत्राटदाराचा अर्थपूर्ण मिलीभगत पणा मुळे रस्त्याचे निष्कृष्ट दर्जाचे काम होत आहे.रस्त्याचे काम चांगले दर्जेदार होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी कंत्राटदाराला जाब विचारले तर कंत्राटदार मुजोरी करतो जा तुम्हाला जे करायचे ते करा मी रस्त्याचे डांबरीकरण मातीवरच आसतरणार अश्या भाषेत नागरिकां सोबत मुजोरी करतो अशी माहिती नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी जवळ कथन केले.टेकामांडवा ते पुडियाल मोहदा रस्त्याचा काम कंत्राटदाराने चांगला दर्जेदार करावेत अन्यथा आमच्या रोषाला सामोरे जावे असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here