Home महाराष्ट्र ११ मे “महात्मा दिन ” साजरा करण्यात यावा- प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन

११ मे “महात्मा दिन ” साजरा करण्यात यावा- प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन

200

🔸श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्यच्यावतीने आवाहन

✒️चोपडा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

चोपडा(दि.7मे);-श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्य या संघाच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व फुलेप्रेमींना आवाहन करण्यात येते की, ११ मे “महात्मा दिन” साजरा करण्यात यावा कारण ११ मे १८८८ रोज़ी ज्योतीबा फुलेंना “महात्मा” ही पदवी लोकांनी बहाल केली होती. दलित आणी निराधारांना न्याय मिळावा या करीता ज्योतीबांनी ‘ सत्यशोधक समाज’ चीं स्थापना केली. त्यांची समाजसेवा पाहुन ११ मे १८८८ रोज़ी मुंबई येथे एका विशाल सभेत लाखोंच्या उपस्थितीत त्याना “महात्मा” ही पदवी बहाल करण्यात आली. ज्योतीबा फुले यांना त्यांनतरच “महात्मा ज्योतीबा फुले” या नावाने जगभरात ओळखले जाऊ लागले . ‘महात्मा’ ही पदवी लोकांकडुन, जनतेकडुन प्राप्त करनारे संम्पुर्ण जगात “महात्मा फुले” हे पहीले समाजसुधारक आहेत. म्हणुनच “महात्मा दिनास” महत्व आले आहे. त्यामुळे महात्मा दिन सर्वांनी साजरा करावा, असे आवाहन संघाचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र सुरेश महाजन यांनी केले आहे.

आधुनिक भारतातील पहिले समाजक्रांतीकारक म्हणुन त्यांना ओळखले जाते. त्यांनी ब्राम्हण – पुरोहित यांच्याशिवाय विवाह संस्कार सुरु केले. आणि यास मुंबई हायकोर्टाची मान्यता सुद्धा मिळवली . तसेच मराठीत मंगल अष्टके सुद्धा लिहीली.ते बालविवाह विरोधात आणी विधवा विवाहाचे समर्थक होते. आपल्या जिवनाच्या कार्यकाळात त्यांनी भरपुर पुस्तकें लिहीली. जसे तृतीय रत्न , छत्रपती शिवरायांचा पवाडा, शेतकर्यांचा आसुड, गुलामगिरी, आदी. महात्मा फुलेंनी केलेल्या एकत्रित संघर्षामुळे सरकारला अँग्रीकल्चर अँक्ट पास करावा लागला होता. सन १८४८ मध्ये भारतातील पहीली मुलींची शाळा , भीडेवाडा , पुणे येथे काढली.आणी पत्नी सावित्रीबाई फुलेंना भारतातील पहील्या शिक्षिका तसेच मुख्याध्यापीका बनविले.
शिवजयंतीचे जनक, तसेच आंबेडकरांचे गुरु हे महात्मा फुले आहेत. त्यामुळेच शिवजयंती, आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंतीप्रमाणेच “महात्मा दिन” साजरा केला जावा, याकरीता श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य ही संघटना २०१६ पासुन प्रयत्न करत आहेत. मागील वर्षी ११ मे रोज़ी महाराष्ट्रातील सुमारे १८ जिल्ह्यांत “महात्मा दिन” साजरा केला गेला.

त्यानिमित्ताने महात्मा फुलेंना अभिवादन करण्याबरोबरच त्यागनी लिहीलेल्या पुस्तकांचे वाटप , रक्तदान , नेत्रतपासनी, मोफत मोतींबींदु अॉपरेशन, आरोग्य शिबीरे, विधवा महीलांना साड्यावाटप, पाणपोई उद्घाटन, अन्नदान आदी कार्यक्रमांबरोबरच जिल्हाधिकारी,तहसीलदार यांना महात्मा दिन प्रशासकीय स्तरावर साजरा व्हावा, याकरीता सर्व जिल्ह्यामध्ये निवेदन देण्यात आले होते. अशाप्रकारे शासन दरबारी सुद्धा प्रयत्न चालु आहेत, अशी माहिती महाजन यांनी दिली.
अशाप्रकारे यावर्षीसुद्धा सर्व फुलेप्रेमींनी, सर्व सामाजिक, राजकीय संघटनांनी महात्मा दिन साजरा करतांना महात्मा फुलेंना अभिवादनाबरोबरच समाजपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन संघाचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र सुरेश महाजन यांनी केले.

Previous articleअर्हेर-नवरगाव येथील लाभार्थी महिलांना गॅस वाटप
Next articleटेकामांडवा ते पुडियाल मोहदा रस्त्याच्या कामात अनियमितता?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here