



🔹प्रधानमंत्री उज्ज्वला योजना(P M U Y)
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.7मे ):- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना(P M U Y) ही मोफत गॅस कनेक्शन देणारी योजना आहे. गरीब कुटुंबाना मोफत गॅस कनेक्शन देने हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. अर्हेर-नवरगाव येथील महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना फार्म भरून आज 7 मे ला योजनेचा लाभ घेतला आहे.सेवा सहकारी संस्था अर्हेर-नवरगाव येथून संस्थेचे सचिव ए. आर. उरकुडे व दिनेश ठेंगरे (बाबू) यांच्या हस्ते लाभार्थ्यांना गॅसचे वाटप करण्यात आले.
गॅस कनेक्शन मिळवणारी लाभार्थी कलाबाई रामभाऊ मदनकार , प्रतिभा दिनेश ठेंगरे, पार्वता ईश्वर ढोरे, निराशा ताकेश ठेंगरे, मंदा मिलिंद लोखंडे , इंदू नरेश बारापात्रे, सुभद्रा सुरेश मैंद, वैशाली विलास चौधरी, वर्षा जितेंद्र ठवरे, सरिता संजय ठेंगरे, संगीता संजय वकेकार, योगिता योगेश्वर दाणी, गोपिका दाणी, योगिता ईश्वर वकेकार, रसिका बेदरे या सर्व लाभार्थ्यांना सुधा गॅस एजन्सी आरमोरी तर्फे गॅस कनेक्शन देण्यात आले. या योजनेसाठी कुटूंबातील एक महिला गॅस कनेक्शन मिळविण्यासाठी अर्ज करू शकते . आपण या योजनेशी संबधित अधिकृत वेबसाइट (pmujjwalyojana.com) वर जाऊन आपली नोंदणी करू शकता व या योजनेचा लाभ मिळवू शकता.


