



🔸दिव्यांग पूर्व तपासणी आणि नोंदणी शिबिराचा शुभारंभ
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.7मे):- माणसानं जन्माला कसं यावं हे आपल्या हातात नाही. मात्र, जन्माला आल्यानंतर कसं वागावं हे आपल्याचं हातात आहे. याची जाणीव बाळगून आपण सर्वांनी लोकव्यवहार केला पाहिजे. आजच्या गतिमान काळात माणसाला स्वत:कडे पाहायला वेळ नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची भावना मागे पडत आहे. समाजातील अंध, अपंग, दिव्यांग घटक सुध्दा आपले बांधवचं आहेत, त्यामुळे त्यांच्याशी प्रेमाने आणि आपुलकीने वागलं पाहिजे. कारण आपण जर त्यांच्याशी चांगला व्यवहार केला, तर त्यांच्याही मनात सकारात्मकतेची भावना वाढीस लागेल आणि त्यांना जगण्यास बळ मिळेल, असे भावनिक आवाहन गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार तसेच समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद परभणी आणि आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या एडीआपी योजना अतंर्गत दिव्यांगांना कृतीम अवयव आणि सहाय्यभुत साधने मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी व नोंदणी दोन दिवसीय शिबीराचे आयोजन गंगाखेड शहरातील संत जनाई महाविद्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी डॉ.संकेत देरवलकर, डॉ.कोमल खाडे, डॉ.अर्चना गोरे, डॉ.निसार तांबोळी, डॉ.शामललित यादव, नसीम खान, रवी इक्कर, नाना वाकडीकर, संत जनाई महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.बी.एन धूत, उपप्राचार्य प्रा.डॉ.चंद्रकात सातपुते अँड.संदीप पाटील, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक किशनराव देशमुख, तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, नगरसेवक सत्यपाल साळवे, वैजनाथ टोले, बालासाहेब टोले, राहूल शेळके, शेख सय्यद उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, आपल्या मतदार संघात असलेल्या सर्व दिव्यांग बांधवांना या शिबीराचा लाभ घेता यावा, हा उदात्त हेतूने आम्ही हे दोन दिवसीय शिबीर आयोजित केले आहे. त्यामध्ये तपासणी सोबतच आवश्यक साहित्य वाटप सुध्दा केले जाणार आहे. दिव्यांगांना मदत व्हावी यासाठीच थेट राजस्थानच्या कानपूर शहरातून हि सगळी डॉक्टर मंडळी आपल्या गंगाखेड नगरीत आले आहेत. त्यामुळे त्यांचा आणि आयोजकांचा उद्देश्य लक्षात घेऊन जास्तीत-जास्त दिव्यांगांनी या शिबीराचा लाभ घेतला पाहिजे. लोकहिताला प्राधान्य देऊन शासकीय योजना पुढे येत असतात. मात्र, त्या योजना यशस्वी करण्याची जबाबदारी जनता आणि प्रशासन या दोघांचीही असते. तेव्हाचं सरकारी योजना जनसामान्यात पोहचत असतात. याकडेही सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला हवं.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विठ्ठल सातपुते व विष्णु वैरागड तर आभार प्रभाकर सातपुते यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाम ठाकूर, अभिजीत चक्के, गोपी नेजे, प्रभाकर माळवे, ऋषिकेश बनवसकर, सचिन राठोड, राहूल गाडे, धनराज बीडकर, चेतन पंडित यांनी विशेष परिश्रम घेतले.





