



✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
नागपूर(दि.7मे):- नागपूर महानगरपालिका अंतर्गत स्थायी व अस्थायी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून ऐवजदर सफाई कामगारांना गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून सेवाकाळ होऊन ही आजपर्यंत नियमित करण्यात आले नाही. कालबद्ध तसेच नियमित पदोन्नती पासून हे कामगार कर्मचारी वंचित आहेत. मागासवर्गीयांचे पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.पदोन्नती मध्ये मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा संकल्प करा असे दिलीप तांदळे यांनी आवाहन केले.
स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनच्या वतीने आयोजित स्वतंत्र मजदूर युनियनचे केंद्रीय कार्यालय निलकमल कॉम्प्लेक्स महाजन मार्केट सीताबर्डी नागपूर येथे नागपूर महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांच्या सभेत ते बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष गितेश सरिता गंगाराम पवार होते तर अतिथी म्हणून स्वतंत्र मजदूर युनियनचे केंद्रीय उपाध्यक्ष नरेंद्र जारोंडे, राज्यध्यक्ष सागर रामभाऊ तायडे, राज्य महासचिव ज्ञानेश्वर खैरे, राज्य संघटक गणेश उके, स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन चे केंद्रीय महासचिव रविंद्र सूर्यवंशी, केंद्रीय कोषाध्यक्ष मा.कालिदास रोटे यांनी सभेला मार्गदर्शन केले.
या प्रसंगी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन नागपूर महानगर पालिकेची शाखा गठीत करण्यात आली असून अध्यक्ष म्हणून दिलीप तांदळे, कार्यकारी अध्यक्ष विनय बगले, उपाध्यक्ष सिद्धार्थ झोडपे, मुकेश शंभरकर, राजेंद्र पुसेकर, विश्वनाथ लोखंडे, सचिव सौ.एस्तर शिंदे, सहसचिव विशाल शेवारे,मंजुषा पोहरे, मनोज लोखंडे, टिकाराम लोखंडे, संघटन सचिव सौ. हेमलता अंबादे, सौ.मिनाक्षी दहिवले, भोला खोब्रागडे, कमलेश भैसारे, कोषाध्यक्ष राजेश वासनिक, कार्यकारी सदस्य दिपक जांभुळकर, अतुल महतो, राजेश चौरे, सुधाकर गवई, हरिष पेंदाम, रुपचंद गेडाम, भास्कर मेश्राम, जितेंद्र मोरे, प्रशांत खडसे, विप्लव भगत, मोहम्मद अब्दुल कबीर इत्यादी पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
सभेत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या मनपा नागपूर मधील रिक्त पदे, पदोन्नतीतील आरक्षण व शासनाचे महानगरपालिके संबधी परिपत्रके व शासन निर्णय इत्यादी विषयांवर चर्चा करण्याचा सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला.सभेला नागपूर मनपातील अधिकारी, कर्मचारी व कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. सभेचे संचालन गणेश उके यांनी केले तर आभार सौ.एस्तर शिंदे यांनी मानले.


