Home Breaking News टिप्पर व दुचाकीच्या अपघातात दोन ठार एक जखमी

टिप्पर व दुचाकीच्या अपघातात दोन ठार एक जखमी

330

🔸संध्याकाळी होते चुलत भावाचे लग्न

🔹नागभीड ब्रम्हपुरी मार्गावरील घटना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.7मे):-नागभीड वरून ब्रम्हपुरी कडे जाणाऱ्या एम.एच.40 बी.जी. 5441 या क्रमांकाचा टिप्पर व नागभीड जवळील चिखल परसोडी वरून नागभीड कडे येणाऱ्या एम.एच.31 बी.आर.1747 या क्रमांकाच्या दुचाकी चा नागभीड रेल्वे फाटक जवळ जोरदार अपघात झाला यात चिखल परसोडी येथील बोकडे कुटुंबातील भुषण शामराव बोकडे (21),पवन विनोद बोकडे (15) यांचा जागीच मृत्यू झाला तर गिरीश सुधाकर बोकडे (16) हा गंभीर जखमी झाला.जखमी गिरीश ला नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ब्रम्हपुरी येथील खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.

मृतक भूषण बोकडे हा नागभीड येथील किराणा दुकानात काम करत होता आज घरी चुलत भावाचा संध्याकाळी लग्न असल्याने आज तो दुकानात आला नव्हता मात्र आपल्या चुलत भावंडासोबत काही कामानिमित्त नागभीड येथे दुचाकी ने येत असताना हा भीषण अपघात झाला यात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. वरील दोन्ही मृतकांचे प्रेत हे ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे उत्तरीय तपासनी साठी आणले आहेत.मृतक आणि जखमी हे सर्वसामान्य कुटुंबातील असून आईवडील हे मजुरीचे काम करतात. मृतक भूषण बोकडे याला आईवडील एक भाऊ व एक बहीण आहे तर पवन बोकडे याला आईवडील व एक बहीण आहे. या घटनेने बोकडे कुटुंबावर आणि गाववासियावर फार मोठे दुःख कोसळले आहे. दरम्यान आज गावात असलेले सर्व धार्मिक कार्यक्रम तसेच स्वागत समारंभाचा कार्यक्रम संदोकर कुटुंबाने रद्द केलेला आहे.या संपूर्ण घटनेचा तपास नागभीड पोलीस स्टेशन चे ठाणेदार राजू मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here