



✒️नांदेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नांदेड(दि.6मेप्रतिनिधी):- येथे सार्वजनिक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जयंती सोहळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . नांदेड येथील अतिथी हॉटेलमध्ये ११-०० वाजता महात्मा बसवेश्वर महाराज महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त यांच्या जीवन कार्यावर महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष तथा जन सन्मान चे मुख्य संपादक- प्रा. दशरथ वैजनाथ रोडे यांनी सखोल माहिती व मार्गदर्शन केले.
जगात आज ३ मे जागतिक प्रेस दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. जगात इंग्रजी हिंदी, दोन वृत्तपत्रांनी सत्ता मिळवली. परंतु देशातील वेगवेगळ्या भाषा, धर्म, जात, वर्ग, विचार , आणि राज्यातील वेगवेगळ्या बोली भाषा धर्म, जात, यावर सुध्दा वृत्तपत्र आणि पत्रकार काम न करता सर्व धर्म समभाव वृत्तपत्रांनी कारावे रोडे म्हणला. वृत्तपत्र हे स्वतंत्र आहेत . वृत्तपत्राला जंजीरांच्या किंवा एक हाती पत्रकारांनी बांधून टाकू नये . देशातील असंख्य वृत्तपत्रांचा उदय होतो. परंतु वृत्तपत्रमध्ये एका जातीवर ,धर्मावर, वृत्तपत्र व पत्रकारांचा विकास होत नाही. तर मुक्त स्वास आणि स्वतंत्रपणे वाचकांच्या विचार मांडण्याची प्रयत्न करावा. आज साप्ताहिक, दैनिक, त्रिमासिक , छापाई अशी वृत्तपत्रांनी आपली सामाजिक बांधिलकीतून पत्रकारिता करावी. व्यवसाय म्हणून त्याकडे पाहू नये असे रोडे सर याप्रसंगी बोलताना मत व्यक्त केले.
क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर , महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, नैतिकता, जोपासण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर कार्य केले. त्यामुळे आपणही या वेळी प्रतिज्ञा करु . या देशातील महापुरुषांच्या विचारांनेच सामाजिक क्रांती निर्माण होवू शकते. या कार्यक्रमास दैनिक अर्थ या वृत्तपत्राच्यावतीने आयोजित जयंतीस नांदेड जिल्हा व शहारातील असंख्य विधीतज्ञ, महिलांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. संपादक, आगासे सौ. संपादकीका. आगासे ॲड चंदा जेठेवाड, ॲड जगजीवन सर ॲड. बोईन्ठवाड. वकील संघाचे विधीतज्ञ .पत्रकार, संपादक, इतर मान्यवर उपस्थित हो





