




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.6मे):-जिल्हा रुग्णालयातील कोवीड कार्य काळामध्ये जिल्हा रुग्णालय केंद्र व राज्य शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी आला संबंधित निधी वाटप केल्यानंतर आरोग्यवरती खर्च करा म्हणून करण्यात आला पण यामध्ये बीड जिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज कंत्राटी कर्मचारी भरती इंजेक्शन काळाबाजार प्रकरण 110 कोटी रुपये साहित्य खरेदी तसेच डॉक्टरांच्या आलिशान कॅबिन जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या बैठकीत हाॅल जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कॅबिन तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांना बसण्यासाठी एक पर्सनल रूम ज्यामध्ये इसी सोपासेट फ्रीज टीव्ही यासह सर्व सोयीसुविधा कोवीड कार्य काळामधील निधी यामध्ये बीड जिल्हा रुग्णालय मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असताना तयार करून तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे विद्यमान औषध भांडार प्रमुख तानाजी ठाकर शेख रियाज अली उस्मानी यांनी मुख्य सूत्रधार डॉक्टर सुखदेव राठोड यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत बडतर्फ कर्मचारी राजरतन जायभाय रक्तपेढीमध्ये कार्यरत असणारा व नंतर गुत्तेदारी साठी स्वतःचे नोकरी सोडून गुतेदारीचे काम करणारा गणेश बांगर विद्यमान रक्तपेढी प्रमुख जयश्री बांगर या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहे.
तर यांची पाठराखण करण्यासाठी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते यांची अगोदर आरोग्य विभागाने तडकाफडकी कारवाई करत त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक पदावर हटवून आज जवळपास दहा महिने होत आहेत तरी जिल्हा शल्यचिकित्सक पदी प्रभारी चार्ज म्हणून डॉक्टर सुरेश साबळे यांना प्रभारी पदी बसवले असतांना यांनी सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये घोटाळ्यातील कोवीड कार्यकाळांमध्ये बोगस पद्धतीने साहित्य खरेदी बोगस कोवीड कर्मचारी भरती प्रक्रिया रेमडेसिव्हर इंजेक्शन काळाबाजार प्रकरण,सह अन्य भ्रष्टाचाराला त पुन्हा पाठबळ देत यांनी बांगरच्या एजन्सीलाच संधी देण्यात आली इतर एजसीना त्यांनी संधी दिली नाही यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यासंदर्भातील भ्रष्टाचाराची 110 कोटी रुपये बोगस कोवीड साहित्य खरेदी तथा बोगस कोवीड कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया घोटाळा इंजेक्शन काळाबाजार प्रकरण तसेच सीसीटीव्ही खरेदी सेंटर व जिल्हा रुग्णालय रिपेरिंग तसेच जिल्हा रुग्णालयातील वेगवेगळ्या घोटाळ्यासंदर्भात भ्रष्टाचाराची चौकशी आरोग्य उपसंचालक लातूर व मुंबई मंत्रालयात आराम चालू असताना या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे, दिपक थोरात तक्रारदार वेळोवेळी तक्रारी केल्यानंतर संबंधित प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी आरोग्य उपसंचालक लातूर आरोग्य संचालनालय मुंबई आरोग्य भवन प्रधान सचिव या आरोग्यमंत्री यांनी वेळोवेळी या ठिकाणी या दिल्यामुळे संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी चालू असताना संबंधित प्रकरणांमध्ये जवळपास कोट्यवधी रुपयाचे निधी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यकाळातील बिल व विद्यमान प्रभारी डॉ सुरेश साबळे यांनी संगम मत करून या ठिकाणी बिले अदा केली.
आहेत यामध्ये सुरेश साबळे यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकाळात मध्ये आलेल्या जवळपास 63 कोटी 90 लाख तर तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुर्यकांत गिते यांच्या कार्यकाळात 42कोटी स17लाख रुपयाच्या निधीचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे यामध्ये पूर्ण संपल्यानंतर जवळपास 85 हजार कीट तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे त्यांनी खरेदी केलेल्या आहेत तसेच वेगवेगळे साहित्य ही सुरेश साबळे यांच्या कार्यकाळात मध्ये जवळपास 106 कोटी रुपयांचा खर्च दाखवून निधी हडपण्याचा प्रयत्न झालेला आहे यामध्ये डॉक्टर सुरेश साबळे प्रभारी आहेत संबंधित डॉक्टर सुरेश साबळे यांच्या तक्रारी संदर्भात चौकशी केली असताना माहिती अहवाल किंवा संदर्भातील कोणतेही कागदपत्र देत नाहीत व अरेरावीची भाषा करतात तर सर्वच सांगतात की पालकमंत्री धनंजय मुंडे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विचारा किंवा पालकमंत्री धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्याकडून माहिती घेऊन जा तुम्हाला मी माहिती देऊ शकत नाही काय करायचं करून घ्या असा शब्द वापरतात तर संबंधित प्रकरणांमध्ये मला कसल्या प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही मी डॉक्टर सुरेश साबळे हा प्रभारी आहे त्यामुळे मला संबंधितावर कारवाई करता येत नाही त्यामुळे प्रभारी पदाचा चार्ज काढून डॉक्टर सुरेश साबळे यांची सखोल चौकशी करून 106 कोटी रुपयांचा हिशोब डॉक्टर सुरेश साबळे यांच्या कडून घेण्यात यावा व या ठिकाणी डॉक्टर सुरेश साबळे यांना या पदावरून काढून दुसरा कायमस्वरूपी बीड जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक देऊन सहकार्य करावे व भ्रष्टाचाराचा मोरक्या डॉ सुरेश साबळे यांना हटवून पदभार काढून नविन कायमस्वरुपी जिल्हा शल्यचिकित्सक देण्यात यावा असे एका प्रसिद्धीपत्रकात भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चा चे राज्य सचिव दिपक थोरात यांनी म्हटले आहे.




