Home महाराष्ट्र वन समृद्धीतून नटलेल्या चोरटी ग्रामसभेने स्वीकारला ग्रामसमृद्धीचा महामार्ग

वन समृद्धीतून नटलेल्या चोरटी ग्रामसभेने स्वीकारला ग्रामसमृद्धीचा महामार्ग

251

🔸लोकसहभाग व वनव्यवस्थापनातून ग्राम विकासाचा संकल्प

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.5मे):-राष्ट्रीय पंचायतराज दिन देशाच्या संसदीय शासनपद्धतीतील एक महत्वाचा दिवस 24 एप्रिल 1993 या दिवशी 73 वी घटना दुरुस्ती करून भारतीय पंचायतराज व्यवस्था संवैधानिक ठरविण्यात आली. ह्या दिवसाचे औचित्य साधून चोरटी गावात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ह्या ग्रामसभेत लोक सहभाग व वनसमृद्धीतून ग्राम विकासाचा संकल्प करण्यात आला यात ग्रामस्थ सभासदांची उपस्थिती लक्षणीय होती, प्रथम ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी श्री दिलीपभाऊ राऊत यांची एकमताने निवड करण्यात आली. या ग्रामसभेत ग्रामसभा बळकट करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ग्रामसभेच्या 18 वर्षावरील प्रौढ स्त्रिपुरुष सदस्यांनी एकत्र यावे. लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावाच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे. ग्राम पंचायतीला सल्ला द्यावा व मार्गदर्शन करावे थोडक्यात सांगायचे तर ग्रामसभेच्या सदस्यांनी गावाच्या विकासात सहभागी व्हावे. याशिवाय ग्रामसभेने ग्रामपंचायत करीत असलेल्या कामाची माहिती घ्यावी आणि ग्रामपंचायतीला सूचना कराव्यात. ग्रामपंचायती वर निवडून दिलेल्या सदस्यांनी चांगली कामे केली तर प्रोत्साहन द्यावे.

या ग्रामसभेत अनुसूचीत जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वन हक्काची मान्यता ) अधिनियम 2006 व नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 नुसार विविध ठराव पारित करण्यात आलेत. या ठरावावर चर्चा करतांना अधिनियम 2006 कलम 3 (1) नुसार वैयक्तिक व सामूहिक वनहक्क किंवा दोहोंचे धारणाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत याची माहिती देण्यात आली.

ग्रामसभेत वन हक्क समितीचे पुनर्गठन करण्यात आले व वनहक्क समिति सभासदपदी श्री माधवजी वल्के श्री उद्धवजी कोरवाते,श्री बालकृष्णजी मेश्रम, श्री अविनाशजी रामटेके, श्री भीमरावजी
सोनडवले, श्री संदीपजी ढोरे ,श्री बलिरामजी बुल्ले, श्री लोकेशजी राउत श्री प्रीतम ढोरे व श्री सतीन्द्र पारधी यांची निवड करण्यात आली व यामधुन वन हक्क समितीचे अध्यक्षपदी श्री बलिरामजी बुल्ले यांची नियुक्ति करण्यात आली.तसेच शासन निर्णयानुसार ग्रामस्तरीय समितीचे रचना करून ग्रामस्तरीय समिती अध्यक्षपदी श्री बळीरामजी बुल्ले यांची नियुक्ति करण्यात आली व ठराव पारित केले वनसमृद्धीने नटलेल्या जंगलव्याप्त चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुकास्थित चोरटी गावात ह्या ग्रामसभेत संकल्प करण्यात आला की प्राप्त झालेल्या वनहक्कानुसार लोक सहभागातून वन संरक्षण वन संवर्धन व वन व्यवस्थापनाद्वारे गावात आर्थिक व सामाजिक विकास योजना राबवून गाव समृद्धीकडे नेण्यासाठी जंगलातील झाडे जैवविविधता वन्यजीव पाण्याचे स्त्रोत इत्यादींचे रक्षण करण्याचे आराखडे तयार करण्याचे ठरविण्यात आले.

या ग्रामसभेत ग्रामपंचायत सरपंच सौ. निशाताई मडावी उपसरपंच श्री सुधाकरजी कांबळे व सदस्य सौ.अर्चना मरसकोल्हे सौ. आशाताई चंदनखेडे सौ. रजनीताई देशमुख सौ. सुरेखाबाई कांबडी श्री राजेंद्रजी राऊत पाटील, श्री शालिकजी नन्नावरे श्री राजेंद्रजी ठाकरे यांनी ग्रामसभेच्या नियोजनासाठी सहयोग व मार्गदर्शन केले. ग्रामसेवक श्री. हेमंतजी रामटेके यांनी सभेच्या कायदेशीर बाबी सांभाळल्या. या ग्रामसभेत श्री. बोरचाटे साहेब वनरक्षक तसेच सौ. भारती श्रीरामे मॅडम कृषि सेवक व गावातील प्रतिष्ठित श्री. माधवजी वल्के उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here