Home पुणे प्रशासकीय सेवेत विविध आव्हाने असली तरी ‘जनहित’ केंद्रबिंदू मानून प्रामाणिकपणे काम करणे...

प्रशासकीय सेवेत विविध आव्हाने असली तरी ‘जनहित’ केंद्रबिंदू मानून प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक!

174

🔹भावी स्थापत्य अभियंता अधिकारी यांना जलसंपदा विभागाचे माजी सचिव व्यंकटराव गायकवाड यांचा सल्ला

🔸इन्फिनिटी इंजीनिअरिंग ॲकॅडमीमध्ये शंभरहून अधिक गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.5मे):- पंडित जवाहरलाल नेहरू ऑडीटोरीयममध्ये एमपीएससी मध्ये यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या शंभरहून अधिक गुणवंतांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी श्री. व्यंकटराव गायकवाड (माजी सचिव , जलसंपदा विभाग), श्री. अविनाश सुर्वे (माजी सचिव , जलसंपदा विभाग), श्री. राजेंद्र पवार (माजी सचिव ,जलसंपदा विभाग), श्री. प्रविण कोल्हे (अधिक्षक अभियंता, जलसंपदा विभाग), श्री. अतुल चव्हाण (मुख्य अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग), सौ. अनुराधा चव्हाण (सदस्या, जि.प. औरंगाबाद) तसेच इन्फिनिटी इंजीनिअरिंग ॲकॅडमीचे संचालक श्री. गिरीश खेडकर, श्री. स्वप्नील भोर आणि गुणवंतांच्या पालकांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.

श्री. गायकवाड यांनी गुणवंतांचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले की, भावी स्थापत्य अभियंता अधिकारी यांच्या समोर प्रशासनामध्ये विविध आव्हाने असणार आहेत; परंतु ‘जनहित’ केंद्रबिंदू मानून प्रामाणिकपणे काम केले तर लोकहिताचे ठरेल. त्यासोबतच कोणतेही काम करताना आत्मविश्वासाने काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला . या यशानेच हुरळून न जाता प्रत्येक गुणवंतानी पुढील पदांसाठी जय्यत तयारी करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रशासकीय सेवेत काम करत असताना आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून जनतेसमोर आपली भूमिका निभावत असतो. यावेळेस आपल्याला प्रशासन आणि जनहित या दोहोमधील मेळ साधावा लागतो. कोणत्या भावनेच्या आहारी न जाता अन् जनहिताला कोणतीही बाधा न पोहचता आपण आपले कार्य पार पाडले पाहिजे, असे मत राजेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुणवंताचे अभिनंदन करतेवेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी प्रशासकीय सेवेतील अनुभवही आवर्जून सांगितले. तसेच पुढील वाटचालीसाठी गुणवंतांना शुभेच्छाही दिल्या. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागते व अडचणींवर मात करत आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहोचावे, याचे अनुभव कथन काही गुणवंतांनी केले. या यशामध्ये आपल्या मेहनतीसोबतच इन्फिनिटी अकॅडमीचा सिंहाचा वाटा असल्याचं, गुणवंत विद्यार्थी विनायक देसाई यांनी सांगितलं.
अनेक गुणवंतांनी आपले अनुभव सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरुन त्यांची मेहनत, त्यांचे प्रयत्न आणि स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. इन्फिनिटी अकॅडमीचे संचालक ‍श्री. गिरीश खेडकर यांनी आपले मत व्यक्त़ करताना, प्रत्येक गुणवंताचे, त्यांच्या कुटुंबियांचे आणि इन्फिनिटी अकॅडमीतील प्रत्येक सहकाऱ्याचेही आवर्जून अभिनंदन केले. अशीच मेहनत करा. चिकाटी ठेवा आणि आत्मविश्वासाने जनहिताचा विचार करुन आपल्या प्रशासकीय सेवेत वेगळा ठसा उमटवा, असा सल्लाही त्यांनी प्रत्येक भावी प्रशासकीय अधिकाऱ्याला दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयपाल खेडकर यांनी, तर प्रमोद देशकरी यांनी अभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here