Home महाराष्ट्र मुकूटबन ग्रामपंचायत कडून जनतेला दूषित पाणी पुरवठा सुरू-जनतेला विविध आजार होण्याची दाट...

मुकूटबन ग्रामपंचायत कडून जनतेला दूषित पाणी पुरवठा सुरू-जनतेला विविध आजार होण्याची दाट शक्यता

186

✒️सिद्धार्थ दिवेकर(यवतमाळ प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.5मे):- झरी तालुक्यातील सर्वात मोठी १५ सदस्य असलेली ग्रामपंचायत तसेच १५ हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलंएल्या मुकुटबन ग्रामपंचायत मध्ये मोठा गोंधळ मजला असुन या गोंधलामुळे गावातील जनतेला याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणा मुले ग्रामवासीयांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे.तसेच गावातील जनतेला खराब व घाण वास येत असलेल्या पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे.वॉर्ड क्रमांक २ मध्ये गेल्या १५ दिवसापासून घाण वास येत असलेले पिवळसर कलरचे खराब पाणी पुरवठा केल्या जात आहे. घाण पिवळसर कलरचे गढूळ पाणी पुरवठा सुरू असल्याने नागरिकांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर आलं आहे. तर जनतेला विविध आजार होण्याची दाट शक्यात नाकारता येत नाही. नळातून येणारे पाण्यात वास येत असल्याने आंघोळ करणे सुद्धा कठीण झाले आहे वॉर्डातील नागरिक पाणी पीत सुद्धा नाही आहे .या पाण्याने स्वयंपाक सुद्धा करीत नाही आहे. वॉर्डातील काही नागरिक तर स्वयंपाक व पिण्यामरिता फिल्टर पाण्याचा वापर करीत आहे.

गोरगरीब जनतेला फिल्टर पाण्याकरिता पैसे नसल्याने नाईलाजसत्व याच पाण्याने स्वयंपाक करावे लागत आहे. नळाच्या दूषित पाण्यामुळे गोरगरीब जनतेला आजार जडल्यास याला जवाबदार कोण असा संतप्त प्रश्न वॉर्ड क्र २ मधील जनता करीत आहे. नळाच्या दूषित पाण्याचा वापर जनता फक्त भांडे व कपडे धुण्याकरिता वापर करोत आहे. दूषित पाण्याबाबत विचारणा केली असता पुष्कळ दिवसापासून बंद असलेली बोअर मध्ये तीन ते चार पाईप टाकून सुरू केली व त्याच बोअर पाणी असल्याचे सांगण्यात आले. अशुद्ध व खराब पाणी पुरवठा गेल्या १५ ते २० दिवसापासून सुरू असताना सुद्धा वॉर्ड क्र २ मधील तिनही सदस्य मूग गिळून गप्प बसून आहे. वॉर्डातील होणाऱ्या समस्येबाबत एकही शब्द ग्रामपंचायत मध्ये बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सदस्य म्हणून निवडून दिल्यावरही जनतेच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे असा संतप्त प्रश्न वॉर्ड क्र २ मधील जनता उपस्थित करीत आहे.

एक वर्षात ग्रामपंचायत मधील पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार जळण्याचे व दुरुस्तीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाळाल्याची माहिती आहे व त्याचा खर्चही मोठा आहे. पाच वर्षात जितक्या मोटारी नाही जळल्या त्यापेक्षा जास्त एक वर्षात जळल्याने ग्रामपंचायत वर संशय संशय होत आहे.गेल्या एक वर्षात ग्रामपंचायत मध्ये बिल काढणे,कामाकरिता भांडण तंटे करणे एवढंच प्रकार जनतेला पहायला मिळाला आहे. परंतु जनतेच्याअ मूलभूत गराजेकडे तसेच ग्रामविकासकडे लक्ष देण्याचे सौजन्य अजूनपर्यंत दाखविण्यात असले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत बाबत ग्रामवासियात प्रचंड संताप उफारळला आहे. गावात कोणतेच काम पूर्ण झाले नाही तर प्रत्येक कामात बिलावरून फक्त भांडण आरडाओरड होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ग्राविकासाबाबत किती तत्पर आहे हे ग्रामवासीयांना दिसून पडले आहे.

वॉर्ड क्रं २ मधील दूषित खराब पाणी लुरवठा होत असूनसुद्धा सरपंच, उपसरपंच, सचिव 2 सदस्य फक्त आपले स्वार्थ साधत असून जनतेकडे दुर्लक्ष करीत आहे. दूषित पाण्यामुळे जनता विवीध आजाराने ग्रासल्यास याला जवाबदार संपूर्ण ग्रामपंचायत राहणार असल्याचे जनता बोलत आहे. तरी दूषित पाणीपुरवठा त्वरित बंद करून स्वच्छ पाणी पुरवठा करावा व जनतेच्या आरिग्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here