Home महाराष्ट्र नवीन शैक्षणिक वर्ष 15 जुलै पासून सुरू करा, ऑफलाईन परीक्षा अन्यायकारक ;...

नवीन शैक्षणिक वर्ष 15 जुलै पासून सुरू करा, ऑफलाईन परीक्षा अन्यायकारक ; भारतीय विद्यार्थी मोर्चाचे शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ.शिर्के यांना निवेदन

213

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.5मे):-महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयीन उन्हाळी सत्र परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेऊन नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू करण्यात यावेत आणि ज्या परीक्षा ऑफलाईन होत आहेत त्या अन्यायकारक आहेत यासदर्भातले निवेदन भारतीय विध्यार्थी मोर्चा च्या वतीने शिवाजी विध्यापिठाचे कुलगुरू डॉ. शिर्के यांना देणेत आले.
या निवेदनात म्हटले आज की, कोरोना काळानंतरची महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता कोरोना काळानंतरही आजपर्यंत गावाकडील विद्यार्थी वस्तीगृहाच्या प्रवेशासाठी झटत आहेत. तसेच एस टी महामंडळाच्या संपामुळे खेड्यातील विद्यार्थी कॉलेज-महाविद्यालया मध्ये पोहचू शकले नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.

ऑनलाईन लेक्चर आणि ऑनलाईन परिक्षा या मुळे शिक्षणाचा दर्जा खालावत चाललेला आहे यामध्ये दुमत नाही. परंतु आज विद्यार्थी निम्या शैक्षणिक वर्षांत सोडून सरकारने घेतलेला ऑफलाइन परीक्षेचा निर्णय पूर्ण अवास्तव आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा व शैक्षणिक वर्षांचे नुकसान करणारा आहे. लेक्चर ऑनलाइन आणि परीक्षा ऑफलाईन हे न पटणारे समीकरण आहे असे निवेदनात म्हटले असून
शिक्षणात सुसूत्रता येण्यासाठी आगामी परीक्षा मे 2022 अखेर ऑनलाईन पध्दतीने घेऊन 15 जून ते 15 जुलै 2022 पासून नवीन शैक्षणिक वर्षे सुरू करणे गरजेचे आहे.

विद्यापीठाच्या नियमानुसार उन्हाळी परीक्षा त्या साधारण जुलै मध्ये सुरू होतील जर जुलै मध्ये परीक्षा झाली तर निकाल कधी लागणार? आणि पुढील शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार असा प्रश्न आहे काही विद्यार्थ्यांना पुढे प्रवेश घ्यायचा असतो तर कोणाला परदेशात जायचे असते .पण परीक्षेचा निकालच लांबणीवर गेला तर विद्यार्थ्यांचे पूर्ण वर्ष वाया जाईल. त्यामुळे उन्हाळी परीक्षा ऑनलाईन घेतल्यामुळे वेळेत परीक्षा होतील आणि वेळेत निकाल आणि पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होईल.तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी हिताचा निर्णय घ्याल अशी अपेक्षा भारतीय विद्यार्थी मोर्चा या निवेदनाद्वारे कुलगुरूंना विनंती करन्यात आली आहे.भारतीय विद्यार्थी मोर्चाचे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू तर्फे राज्यपालाना निवेदन देणेत आले.निवेदन देतेवेळीऍड.सुनील नागदिवे , ऍड.संतोष नावलाज अमित कौलवकर आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here