



✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.5 मे):-येथील मनसे सैनिकांच्या वतीने पहाटे खडकेश्वर मंदीर येथे हनुमान चालीसा पठण करून महाआरती चे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्या विरोधात आपले विचार काल पत्राद्वारे प्रसार माध्यमाद्वारे मांडल्या नंतर भोंग्या च्या आवाजाच्या दुप्पट हनुमान चालीसा वाजून भोंग्या मुळे होणारा त्रास काय असतो त्यांना आपण समजू द्या व आपली ठाम भुमिका मांडत असा आदेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमरखेड च्या वतीने महाआरती व हनुमान चालीसाचे पठण खडकेश्वर महादेव मंदिर येथे करण्यात आले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसाचे पठण केले यावेळी मनसे शहर अध्यक्ष संजय बिजोरे, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डेविड शहाणे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
महाआरती व हनुमान चालीसा पठण नंतर पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष डेविड शहाणे, शहराध्यक्ष संजय बिजोरे,संदीप कोकाटे, आकाश वोझलवार ,अमोल लांबटिळे यांना पोलीसांनी अटक करून पोलिस स्टेशन येथे नेण्यात आले व मनसे सैनिका विरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून सूचना देऊन सोडण्यात आले .


