Home महाराष्ट्र प्रहार युवक आघाडी अमरावती जिल्हा उपजिल्हाप्रमुख आकाश हेडाऊ ची निवड

प्रहार युवक आघाडी अमरावती जिल्हा उपजिल्हाप्रमुख आकाश हेडाऊ ची निवड

193

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.4मे):-ना. बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या युवक आघाडी उपजिल्हाप्रमुख पदी आकाश विनोदराव हेडाऊ यांची निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख पवन ऊर्फ छोटू महाराज वसू व शहर प्रमुख बंटीभाऊ रामटेके, युवक आघाडीचे जिल्हाप्रमुख आकाश गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत पदभार देण्यात आला.

युवक आघाडी उपजिल्हाप्रमुख पदी काम करत असताना या पदाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे व तसेच पक्षाचे संस्थापक .ना. बच्चुभाऊ कडू यांनी देशभरात चालविलेले कार्य तळागाळापर्यंत पोहचवून ते वाढविणार असल्याचा संकल्प युवक आघाडी चे नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख आकाश हेडाऊ यांनी सांगितले. उपस्थितांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here