Home महाराष्ट्र प्रशिक्षित तरुण तडपदार अभ्यासू कामगार कार्यकर्त्याचा सत्कार

प्रशिक्षित तरुण तडपदार अभ्यासू कामगार कार्यकर्त्याचा सत्कार

275

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.4मे):-कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे प्रशिक्षित तरुण तडपदार अभ्यासू कामगार कार्यकर्ते नेते कुशल नेतृत्व,वकृत्व आणि संघटक असलेले, गेली अनेक वर्षे सामाजिक,धार्मिक चळवळीत सुद्धा सक्रिय सहभाग नोंदविणारे मर्जी संघटनेचे क्रियाशील साथी मा.रूपेश पुरळकर यांचा जागतिक कामगार दिनी, महाराष्ट्र दिनी जाहीर कार्यक्रमात ज्येष्ठ कामगार नेते सागर तायडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. घाटकोपर पूर्व रमाई आंबेडकर नगर येथील शहिद स्मारक समिती सभागृहात “मेरे अधिकार मेरी जिम्मेदारी” (मर्जी) या सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र दिन, कामगार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात माजी न्यायाधीश डॉ.डि.के.सोनावणे,स्तंभ लेखक,साहित्यिक कामगार नेते सागर तायडे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह,ज्येष्ठ पत्रकार विष्णू सोनावणे,पत्रकार तेजस वाघमारे, ब्राईट फ्युचर संस्थेचे सीईओ किशोर पालवे,मर्जीचे संस्थापक अध्यक्ष मंगेश सोनावणे,मर्जी संघटनेच्या प्रवक्त्या प्राची मुक्ती बोध यांच्या प्रमुख उपस्थितीत रुपेश पुरळकर यांच्या कामगार क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल,पुष्पगुच्छ,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात मुंब्रा, कळवा, बदलापूर, भांडूप, शिवडी,कुर्ला, कांदिवली, मालाडगोरेगाव, माटुंगा, धारावी, वरळी, घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी आदी परिसरातील मर्जी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here