Home महाराष्ट्र रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रकने चिरडले

रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रकने चिरडले

91

✒️वणी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वणी(दि.4मे):- घुग्घुस राज्यमार्ग ७ पुनवट गावाजवळ अनियंत्रित ट्रकने आयव्हीआरसीएलच्या कर्मचाऱ्यांना चिरडले, ही घटना दि.४ मे बुधवार रोजी सायंकाळी ५ वाजताची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वणी-घुग्घुस राज्यमार्गावरील पुनवट गावाजवळ रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टर-ट्रॉली व पिकअप वाहन आडवे करून आयव्हीआरसीएलचे कर्मचारी दुभाजकाच्या दुरुस्तीचे काम करत असताना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

ज्यात रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वेदनादायक मृत्यू झाला, घटनास्थळ पाहून ट्रक चालकाने वाहनासह पळ काढला. कस्टमनुसार, फरार झालेले वाहन १८ चाकी एम.एच३१एफ.सी.६३९९ आहे. पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here