Home सामाजिक  निवासी मूकबधिर विद्यालय क-हावागज बारामती येथील शाळेतील मुलांना आष्टीच्या युवा पत्रकार संघाच्या...

निवासी मूकबधिर विद्यालय क-हावागज बारामती येथील शाळेतील मुलांना आष्टीच्या युवा पत्रकार संघाच्या वतीने खाऊचे वाटप

196

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

बारामती(दि.4मे):- तालुक्यातील क-हावागज येथील निवासी मुकबधिर विद्यालयातील अनाथ, निराधार, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, वंचित घटकातील, गोर गरीब कुटुंबातील मूकबधिर मुलांना आष्टी तालुका युवा पत्रकार संघांच्या वतीने शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले.हि शाळा बारामती तालुक्यातील मूकबधिर मुलांची निवासी पहिली शाळा असून पूर्णपणे मोफत चालवली जाते. या शाळेत अत्यंत गरीब मजूर कुटुंबातील पाच वर्षे वयापासूनची ३५ मूकबधिर मुले मोफत निवास व शिक्षणाचा लाभ घेत आहेत. या शाळेत आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, पत्रकार आण्णासाहेब साबळे, संतोष नागरगोजे, अक्षय विधाते, सागर खांडवे यांनी भेट देऊन शाळेतील मुलांन फळे तसेच खाऊचे व इतर मदत करून सहकार्य केले.

यावेळी बोलताना आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम म्हणाले की हि शाळा रामेश्वरी जाधव यांनी कष्टातून चिकाटीने शाळा स्थापन करून त्यांना अनेक उद्दिष्ट गाठायचे आहेत. समाजातून, कुटुंबातून दुर्लक्षित असलेल्या या मुलांना समाजात एक रूप करायचे आहे. नॉर्मल मुलांबरोबर समाजाबरोबर त्यांना वावरता आलं पाहिजे आणि स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी ही संस्था अखंडपणे धडपडत आहे. या मूकबधिर मुलांना कोणाच्या सहानुभूतीवर जगायला लागू नये म्हणून या संस्थेत शिक्षणाव्यतिरिक्त अनेक कलात्मक वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अशा बऱ्याच गोष्टीवर त्या काम करत आहेत. तसेच निवासी मुकबधिर शाळेला भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन काही अडचण आल्यास आम्ही सर्व शक्तिनिशी पाठीशी उभे राहू व वेळोवेळी मदत करू असे आश्वासन दिले. या शाळेत भेट देऊन मुलांना खाऊचे वाटप केल्याबद्दल निवासी मुकबधिर शाळेच्या संस्थापक अध्यक्षा रामेश्वरी जाधव यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleग्रा.प.मेंढा (कि.) व आकापुर येथे घनकचरा गाडी (ई रिक्षा) चे उद्घाटन- माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांचा पुढाकार
Next articleघुग्घुस एआयएमआयएम पक्षातर्फे शेवयी वाटप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here