Home महाराष्ट्र ग्रा.प.मेंढा (कि.) व आकापुर येथे घनकचरा गाडी (ई रिक्षा) चे उद्घाटन- माजी...

ग्रा.प.मेंढा (कि.) व आकापुर येथे घनकचरा गाडी (ई रिक्षा) चे उद्घाटन- माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांचा पुढाकार

204

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.4मे):-आपल्या पंचवार्षिक कार्यकाळात कोट्यावधी रुपयांची विविध विकासकामे पुर्णत्वास नेणारे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या पुढाकाराने पंधरा वित्त आयोग जिल्हा परिषद स्तर यातुन घनकचरा गाडी ( ई रिक्षा ) नागभीड तालुक्यातील ग्राम पंचायत मेंढा(कि.) व आकापुर येथे देण्यात आली.

गाव हे स्वच्छ राहावे व आरोग्यदायी व्हावे या दृष्टीकोनातून गावातील कचरा बाहेर टाकल्या जावे यासाठी या ग्रामपंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्याकडे सदर घनकचरा गाडीची मागणी केली होती. यावर सकारात्मक प्रतिसाद देत संजय गजपुरे यांनी पंधरावा वित्त आयोग जिल्हा परिषद स्तरातून ई रिक्षा मागणीचा प्रस्ताव जिल्हापरिषदेला दिला.

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात प्राप्त १५ व्या वित्त आयोग जिल्हा परिषद स्तर मधुन सदर मागणी मंजुर करण्यात आली . व त्यानुसार ग्राम पंचायत मेंढा ( कि.) व आकापुर यांना कचरा गाडी प्रदान करण्यात आली. या पर्यावरण पुरक घनकचरा गाडीचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधीत ग्रामपंचायत कार्यालयात मेंढा (कि.) चे सरपंच आनंद कोरे व आकापुर चे सरपंच कुणाल गहाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांची विशेष उपस्थिती होती. या कचरा गाडीचा वापर करीत गावकऱ्यांनी आपल्या घरातील कचरा इतरत्र न टाकतां या गाडीतच टाकावा असे आवाहन संजय गजपुरे यांनी याप्रसंगी केले . यावेळी उपसरपंच, ग्रा. पं.सदस्य व गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते . ग्रामपंचायतीला ई कचरा गाडी दिल्याबद्दल मेंढा (कि.) व आकापुर येथील ग्रा.पं.पदाधिकारी व ग्रामस्थांनी संजय गजपुरे यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here