Home महाराष्ट्र गरजवंत 300 कुटुंबाना शिरखुरमा किटचे वाटप

गरजवंत 300 कुटुंबाना शिरखुरमा किटचे वाटप

265

🔸युथ विंग, जमाते इस्लामी हिंदचा उपक्रम

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.3 मे):- दरवर्षी स्थानिक जमाते इस्लामी हिंद तर्फे रमजान महिन्यात वंचित,गरीब, गरजवंत, आर्थीकदृष्टया कमकुवत लोकांना त्याची ही ईद साजरी व्हावी या दृष्टीने शिरखुरमा किट वितरित करण्यात येते.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 300 कुटुंबांना शिरखुरमा साहित्य काजू, किशमिश, बदाम, खोबरा, शेवाळ्या, साखर, डालडा, तेल, साबन इत्यादी साहीत्याच्या किट वितरित करण्यात आल्या.

शहरातील विभिन्न भागात जावून युथ विंग व जमाते इस्लामी हिंदच्या कार्यकर्तानी सर्वेक्षणाअंती गरजु लोकांचा शोध घेवून किट वितरित केल्या .

ईदचा आनंद गरीबांनी पण साजरा करावा या उद्देशाने हे कार्य करन्यात येते.

सर्वेक्षण आणि किट वाटप साठी शाहेद खान नजर खान, आलम खान युसुफ खान, म . साबिर मो . ताहेर , आयाज अली, अक्रम खान लाला, सरफराज मंसूरी, अकिब अहमद , साकिब अली, एजाज खान , शे . तौहीद, शाहेद खान, इम्रान खान, मुब्बशीर अली, वजाहत उल्ला खान,जुबेर खान , आसीफ अहमद, सज्जाद हुसेन,अखील मिर्झा, फैजान लाला, सुहेल लाला, जावेद मनसूरी, रफिक सय्यद ,रिजवान खान , इरफान सैय्यद, सरफराज अली .सय्यद मुशीर, नसीम शेख इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

स्थानिक अध्यक्ष काजी जहिरोद्दीन यांनी या सर्वांचे आभार व्यक्त करत अल्लाह-ईश्वर सर्वकार्यकर्तीना या कार्याचा चांगला मोबदला देवो ,अशी प्रार्थना केली.

गरीबांया आत्मसन्मान अबाधित राहावा म्हणून कोणतीही फोटो काढण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here