Home महाराष्ट्र प्रथमच राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर सूचक पालक मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद: दत्ता भाऊ...

प्रथमच राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर सूचक पालक मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद: दत्ता भाऊ माळी

235

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.3मे):-राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर सूचक व पालक मेळावा माळीनगर माळशिरस या ठिकाणी आयोजित प्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष दत्ता भाऊ माळी, रमेश महाराज वसेकर, बोराटे आप्पा,गिरमे साहेब, उपाध्यक्ष बालाजी माळी, उर्मिला भुजबळ, रवी माळी,अक्षय माळी,पोपट गायकवाड, प्रदीप देवकर, गणेश म्हेत्रे,भरत मोहिते व कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटना व दि सासवड माळी शुगर फॅक्टरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.या भव्य राज्यस्तरीय माळी वधू-वर पालक परिचय मेळाव्यासाठी अपेक्षेपेक्षाही मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने पालक व वधुवर कार्यक्रमांसाठी उपस्थित राहिले.

या मेळाव्यात अर्ज*
*१२०० वधू-वरांनी अर्ज भरुन सहभाग नोंदवला, यामधील ७०० वर प्रत्यक्ष उपस्थित होते. ३०० वधू उपस्थित होत्या. ४०० वरानी प्रत्यक्ष परिचय दिला*. *या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास २ हजार समाजबांधवांनी व भगिनींनी सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माळी सेवा संघ आधारस्तंभ व राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा सौ रूपालीताई चाकणकर मा. शुगर फॅक्टरी डायरेक्टर राजेंद्र गिरमे, ह. भ .प. रमेश महाराज वसेकर, बोराटे आप्पा, माळी सेवा संघ अध्यक्ष दत्ताभाऊ माळी ,उपाध्यक्ष बालाजी माळी, महिला उपाध्यक्ष सौ उर्मिलाताई भुजबळ , ज्ञानदेव जाधव , महाराष्ट्र राज्य प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब ननवरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल आनंतकवळस , खांदे समर्थक अक्षय माळी, उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र रुपेश नेरकर, रवी माळी धाराशिव जिल्हा संघटक ,अंबादास वाघमारे , अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र वधूवर सुचक भरत मोहिते ,मा.बाळासाहेब होले अध्यक्ष सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा युवा उपाध्यक्ष प्रदीप देवकर, जिल्हा संघटक पोपट गायकवाड, जिल्हा सचिव गणेश म्हेत्रे, राजेंद्र एकतपुरे,माळी सेवा संघाचे सर्वच पदाधिकारी बंधू-भगिनी आपल्या उपस्थितीमध्ये हा भव्य राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न झाला*. *यावेळी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना बालाजी माळी म्हणाले की वधू वर सुचक व पालक मेळाव्यासाठी आमच्या अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल आमच्या माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पदाधिकारी बांधवांच्या वतीने तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले*.

चौकट
*प्रथमच माळी सेवा संघ व द सासवड फॅक्टरी शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं. आमच्या अपेक्षा पेक्षाही मोठ्या संख्येने वधुवर व पालक, समाजबांधवांनी उत्स्फूर्त पणे प्रतिसाद नोंदवला. थोड्याच दिवसांमध्ये माळी सेवा संघ संघटनेच्या माध्यमातून या मेळाव्यामध्ये विवाह जुळलेल्या वधू-वरांचे व मोफत सामुदायिक विवाह सोहळा करणार आहोत.असे माळी सेवा संघ संस्थापक अध्यक्ष दत्ता भाऊ माळी उपाध्यक्ष बालाजी माळी व वधुवर सुचक अध्यक्ष भरत मोहिते यांनी सांगितले*.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here