Home महाराष्ट्र बीड जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी डॉ.जे.एन.शेख यांची निवड

बीड जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी डॉ.जे.एन.शेख यांची निवड

153

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.3मे):-काँग्रेसचे पक्षाचे धडाडीचे युवक नेते तथा तालुक्यात मोठा जनसंपर्क असलेले डॉ. शेख जानमहंमद नूरमोहम्मद यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. यानिवडीबद्दल नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस डॉ. जे. एन. शेख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खा.राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पटेल, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.नाना पटोले, बीड जिल्हा प्रभारी देविदास भन्साळी, खा.रजिनीताई पाटील, अशोकराव पाटील, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी परळी तालूकयातील सिरसाळा येथील डॉ.जे.एन.शेख यांची निवड नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी व खा. राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस लाख सर्वसामान्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी तसेच बीड जिल्ह्यात काँग्रेस तळागळा पर्यंत वाढविण्यासाठी व बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी व पक्षाची धेय्य धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाअधिक प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित बीड सरचिटणीस डॉ.जे.एन.शेख यांनी सांगितले.त्यांचा शहरी आणि ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क आहे. त्यांची पक्षावरची निष्ठा व प्रेम निष्ठा याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी येणाऱ्या काळात आपण निश्चित तन-मन-धनाने प्रयत्न करू अशी ग्वाही या नियुक्तीनंतर नवनिर्वाचित सरचिटणीस डॉ.जे.एन.शेख यांनी दिली आहे.

यावेळी कार्यक्रमास उपस्थिती दत्ता कांबळे (अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती ),प्रा.अनिल जाधव (अध्यक्ष ता.परळी.वै.काँग्रेस आय.)प्रा.आशोक देशमुख,रोहिदास निर्मळ,बाळासाहेब गरड ,शेख आबोदिन,जावेद शेख, तरकसे अप्पा ,ज्येष्ठ नेते गणपत आप्पा कोरे, ज्येष्ठ नेते समंदर लाला पठाण, ज्येष्ठ नेते विश्वनाथराव गायकवाड,शिवाजी देशमुख सरचिटणीस परळी शहर काँग्रेस,अड. शशि शेखर चौधरी,चिटणीस परळी शहर काँग्रेस,अशोकराव कांबळे,उपाध्यक्ष परळी शहर काँग्रेस, रणजित देशमुख युवक परळी विधानसभा अध्यक्ष,दीपक शिरसाट शहराध्यक्ष अनुसूचित जाती विभाग,संतोष दौंड युवा नेते,पत्रकार मिलींद चोपडे, जावेद पठान, व ईतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.कमिटीच्या सरचिटणीसपदी सिरसाळ्यातील डॉ.जे.एन.शेख यांच्या निवडीबद्दल सिरसाळा सह जिल्ह्यातून सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here