Home महाराष्ट्र सोनेगांव प्रभागातिल पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे-सुधाकर निवटे( शिवसेना उपतालुका प्रमुख)

सोनेगांव प्रभागातिल पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे-सुधाकर निवटे( शिवसेना उपतालुका प्रमुख)

290

🔹नगर परिषदला तक्रार दाखल

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमुर(दि.3मे):;नगरपरिषद क्षेत्रातील सोनेगांव प्रभागात पाणि पुरवठा टाकीचे बांधकाम सुरु असून अत्यंत निकृष्ट दर्जाचेअसून झालेल्या बांधकामावर पाणी न मारताच टाकीचा पायवा रचला गेला, तसेच सीमेंट, लोहा निकृष्ट दर्जाचा वापरला आहे, 21 दिवसांपासून पाणी पुरवठा टाकीचे काम बंद असून या बन्द कामामुळे उभ्या असलेल्या सलाखीमुळे नागरिकांना शारिरिक इजा होण्याची दाट शक्यता आहे.

या संदर्भात शिवसेना उपतालुका प्रमुख सुधाकर निबटे यांनी चिमुर नगर परिषद ला लेखी तक्रार दिली असून, या तक्रारीत निकृष्ट प्रतिचे झालेले बांधकाम तोडून नवींन बांधकाम करण्यात यावे व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी असा उल्लेख आहे.कार्यवाही नाही झाल्यास शिवसेना स्टाइल ने आंदोलन करू असा इशारा शिवसेना उपतालुका प्रमुख सुधाकर निबटे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here