



🔹महार रेजिमेंट मधून घर वापसी
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.2 मे):-जय जवान जय किसान, च्या नाऱ्यांनी काल दि. 01 मे 2022 रोजी उमरखेड नगरी मध्ये आसमंत दुमदुमला.
यावेळी हजारोंच्या संख्येने देशभक्त एकत्र आले होते.
निमित्त होते मेजर संभाजी पाईकराव हे भारतीय सैन्य दलाच्या महार रेजिमेंट मधून तब्बल 23 वर्षे देश सेवा करून घर वापसी / स्वगृही परत आले.
त्यानिमित्ताने औदुंबर नगरीतील राजे संभाजी नगर मित्र मंडळ आणि आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने मेजर संभाजी मल्हारी पाईकराव यांच्या सन्मानार्थ भव्य दिव्य सन्मान रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
1999 पासून भारतीय सैन्य दलाच्या महार रेजिमेंट, मध्यप्रदेशातील सागर येथील मुख्य केंद्रामध्ये मध्ये जॉईन होऊन अनेक राज्यांमध्ये इमानदारी आणि निष्ठेने आपले कर्तव्य बजावून, जम्मू काश्मीर येथील राजूर या ठिकाणावरून ते सेवानिवृत्त झाले.
मेजर संभाजी मल्हारी पाईकराव यांच्या सन्मानार्थ आयोजित सत्कार समारंभात भारतीय विद्यार्थी मोर्चा, बामसेफ प्रणित भारत मुक्ती मोर्चा,रिपब्लिकन सेना, भिम टायगर सेना,वंचित बहुजन आघाडी, बहुजन क्रांती मोर्चा, यांसह विविध सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत सत्कार मूर्तींचे जोरदार स्वागत केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास अभिवादन करून ,छत्रपती शिवराय, क्रांतिवीर बिरसा मुंडा,संत रविदास महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करीत मोठ्या उत्साह आणि जल्लोषात या सन्मान रॅलीची सांगता बोरबन येथील राजे संभाजी नगर येथे आयोजित भव्य सत्कार सोळ्याने झाली.
ज्यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून, आजी-माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष विवेकजी मुडे, लक्ष्मीकांत पिंपरखेडे, जनार्दन साळवे, मिलिंद बरडे, नितीन जाधव संजय मोहिते, विशाल मुनेश्वर, संतोष पाटील, मेजर सिंगनकर, सर्व आजी माजी भारतीय सैनिक तथा बामसेफचे शिवाजीराव देवसरकर, सदाशिव धुळे, राहुल जी कांबळे, सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना) इत्यादी उपस्थित होते.
यावेळी विवेकजी मुडे जनार्दन साळवे, शिवाजीराव देवसरकर, सदाशिव धुळे यांनी सत्कारमूर्तींच्या सन्मानार्थ आपले मनोगत व्यक्त करीत सैनिकांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
तद्वतच मुनेश्वर साहेब माजी सैनिक यांनी देशभक्तीपर क्रांतिकारी गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
वृत्त सैनिक सत्कार मूर्ती माननीय संभाजी पाईकराव साहेब तथा त्यांच्या सुविद्य पत्नी रंजना संभाजी पाईकराव, मुले सौरभ पाईकराव, आर्यन पाईकराव, बंधू अशोक पाईकराव यांचा सत्कार औदुंबर नगरवासी यांच्या माध्यमातून करण्यात आला.
या न भूतो न भविष्यती सन्मान सोहळ्यास औदुंबर नगर वासियांनी हजेरी लावत मातृभूमीच्या संरक्षणार्थ कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे संचालन भारतीय विद्यार्थी मोर्चा चे दक्षिण भारत प्रभारी विद्वान केवटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे तालुका संयोजक शंकरजी हाटेकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजे संभाजीनगर मित्र मंडळ भारतीय विद्यार्थी मोर्चा चे, ऋषीकेश देवसरकर, भुषण पठाडे, सुहास मूनेश्वर,साहिल रोकडे,अनिल जाधव, संदेश पठाडे, आकाश पवार, संबोधी राऊत,तेजस सावंत,हर्षदीप बरडे,सौरभ पाईकराव, यांसह विविध सामाजिक संघटनांनी परिश्रम घेतले.
रुचकर भोजन आणि क्रांतिकारी गित आणि मेजर संभाजी पाईकराव यांच्या मनोगताने या सत्कार सोहळ्याची सांगता मोठ्या हर्शोल्हासात करण्यात आली.


