Home महाराष्ट्र गोंडपिपरी न.प.अंतर्गत सिमेंट रोडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे(नगरसेवकांनी केले काम बंद)

गोंडपिपरी न.प.अंतर्गत सिमेंट रोडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे(नगरसेवकांनी केले काम बंद)

279

✒️नितीन रामटेके(विशेष प्रतिनिधी)

गोंडपिपरी(दि.3मे):-गोंडपिपरी नगरपंचायत ची निवडणूक नुकतीच पार पडली कोरूना च्या काळामध्ये एक ते दीड वर्ष प्रशासकाच्या मार्फतिने नगरपंचायतीचे कामे सुरू होती. त्यातच काही कामे चुकीच्या पद्धतीने मॅनेज करून वाटप झाले .त्यात सूफी कन्स्ट्रक्शन भद्रावती यांना 43 लक्ष रुपयाचे सिमेंट रोड व नाली बांधकाम करण्याचा कंत्राट दिल्या गेला सदर कामाचा वर्क ऑर्डर सिद्धार्थ मेश्राम मुख्याधिकारी यांनी दिला व आदेश देताच मुख्य अधिकाऱ्यांची प्रशासकीय बदली झाली व दुसरे मुख्याधिकारी रुजू होण्याच्या आतच नगर पंचायतीला कुठलीही माहिती न देता सूफी कन्स्ट्रक्शन ने काम सुरू केले.

परंतु सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले .त्यात जे खडीकरण करावयास पाहिजे परंतु थातुरमातुर गिट्टी ओतून त्यावर बेड काँक्रिट करण्यात आले त्याचा दर्जा सुद्धा खूपच खालावलेला असून कुठलीही कुठलीही स्ट्रेंथ नसल्याने सदर काम हे महिनाभरातच उकडून पडणार आहे. महत्वाचे म्हणजे हे काम M 30 मिक्स डिझाईनच्या ग्रेड नुसार करावयाचे आहे परंतु रेती अधिक आणि गिट्टी कमी त्यातच सिमेंट सुद्धा खालच्या दर्जाचे वापरून काम सुरु केले. तीन दिवसांनी नगरपंचायत येतील सर्व नगरसेवकांना माहिती मिळाल्यावर तात्काळ कामावर भेट देण्यात आली त्यात पूर्णतः बोगस दर्जाचे काम सुरू असल्याचे दिसून आले डेट कॉंक्रीट करत असताना त्याला क्युरिंग झाल्यानंतरच वेअरिंग कोट कॉंक्रिटचा द्यावा लागतो परंतु सरसकट पूर्ण काम करीत असल्याचे निदर्शनास आले तसेच रोडची जाडी व इतर गुणवत्तेत कुठेही बसत नसल्याचे नसल्याने ने चौकशी करेपर्यंत काम बंद करण्याचे आदेश सर्व नगरसेवकांनी दिलेले आहे यात निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याने त्या कामाची स्ट्रेंथ तपासणी करण्यात येऊन दोषी आढळल्यास कंत्राटदाराला काळ्या या यादीत टाकणार असल्याचे मतही व्यक्त केले.

विशेष म्हणजे त्याच बाजूला दोन महिन्या आधी ह्याच कंत्राटदारांनी सिमेंट रोड बांधकाम केले होते त्याला आज घडीला तळे गेलेले आहे . त्या बाजूला रिव्हर्स लावणे काम सुरू करावयाचे असल्याने खाली शेतीची माती टाकून लावल्या जाणार असल्याने गुणवत्तेचे तीन-तेरा वाजले आहेत.सर्व कामांची तपासणी करून मोजमाप हे दुसऱ्या नगर परिषदेतील अभियंत्याकडून करणार असल्याची माहिती. सर्व नगरसेवकां सोबत पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष सारिका मडावी, बांधकाम सभापती सुरेश चीलणकर, महिला व बाल कल्याण सभापती वनिता वाघाडे, गटनेता चेतन गौर , नगरसेवक मनीशा मडावी, नगरसेवक वनिता देवगडे. नगरसेवक यादव राव बांबोडे, नगरसेवक रंजना रामगिरकार ,बबन निकोडे , अश्विनी तोडासे, सभापती सचिन चींतावर., सुनील संकुलवार आदी उपस्थित होत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here