Home महाराष्ट्र राजकुमार जठार यांची भाजपा इंदापूर तालुका संघटन सरचिटणीस पदी निवड

राजकुमार जठार यांची भाजपा इंदापूर तालुका संघटन सरचिटणीस पदी निवड

254

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.2मे):-निमगाव केतकी येथील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते व लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तळागाळापर्यंत काम केलेले ,जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखीमार्ग निर्मलवारी इंदापूर तालुका प्रमुख म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडणारे दौंड पुरंदर इंदापूर तालुक्यात विस्तारक म्हणुन कामाच्या अनुभव भाजपचे कट्टर म्हणून ओळखले जाणारे राजकुमार जठार यांची आज महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, पश्चिम महाराष्ट्राचे भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे ,भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेश तात्या भेगडे ,पुणे जिल्हा संघटन मंत्री अँड धर्मेंद्र खांडरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत इंदापूर तालुका संघटन मंत्री म्हणून निवड करण्यात आली.

तसे पाहिले तर राजकुमार जी जठार साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व त्यांनी आजपर्यंत निमगाव केतकी या गावा बरोबरच तालुक्यामध्ये ही युवक वर्ग तसेच सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, त्यांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द पहिली तर इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी चे पहिले पाच प्रमुख पदाधिकारी होते त्यामध्ये राजकुमार जठार साहेब यांच्या नावाचा नाम उल्लेख केला जातो.राजकुमार जठार साहेब यांनी निवडीनंतर आपण इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विस्तार वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here