Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने कामगारांचा सन्मान

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने कामगारांचा सन्मान

255

🔹महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त केले होते आयोजन

✒️पिंपरी चिंचवड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पिंपरी चिंचवड(दि.2मे):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून दि.१ मे २०२२ रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने सफाई कामगारांचा सन्मान व अल्पोपहार देऊन महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.यावेळी आरोग्य निरीक्षक श्रीकांत कदम, सफाई कामगार हंगामी मुकादम सुर्यकांत रणखांबे,आरोग्य मुकादम नंदर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणतेही काम लहान अथवा मोठे नसते परंतु सफाई कामगार यांचे काम उल्लेखनीय आहे. सफाई कामगार यांच्यामुळे सर्वत्र स्वच्छता राखण्याचे काम केले जाते. सर्वसामान्यांना स्वच्छ व निरोगी आरोग्यासाठी सफाई कामगारांचा मोठा सहभाग असतो. या त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने कामगार बंधू-भगिनींचा सन्मान करून त्यांचे आभार मानण्यात आले.याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्षा सौ मंदा बनसोडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक श्रीनिवास माने, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा उषा लोखंडे, अली इराणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here