




🔹उमरखेड येथे वंचित बहुजन आघाडीचा शांतता रॅली
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.2मे):-देश व राज्यातील सामाजिक सलोखा (भाईचारा) अबाधित राहावा यासाठी वंचित बहुजन आघाडी यवतमाळ (प.)व उमरखेड तालुक्याच्या वतीने शहरात शांतता रॅली यशस्वीरित्या संपन्न.दि.1 मे 2022 संपूर्ण देश व राज्यांमध्ये सांप्रदायिक शक्तीने डोके वर काढले आहे.
जाती -जाती आणि धर्मा-धर्मात सामाजिक तेढ निर्माण करुन दंगली पेटवण्याचे व विषमतेचे वातावरण निर्माण करुन देश व राज्यातील वातावरण कलुशीत करायचे मंदिर- मस्जिद च्या नावाखाली हिंदू -मुस्लिमांना आपसात लढवायचे, हा कट्टरवादी संघटनेचा मनसुबा उधळून लावण्यासाठी, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय ॲड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण राज्यामध्ये दि.01 मे महाराष्ट्र दिनी शांतता फेरी काढुन जनजागृती करण्याचे आवाहन केले होते.
त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी यवतमाळ (प.) व उमरखेड तालुक्याच्या वतीने दि.01/05/2022 रोजी सायंकाळी 6:00 वाजता शहरात शांतता रॅली काढण्यात आली . मानवता हाच खरा धर्म आहे.
बौद्ध-हिंदू- मुस्लिम सिख -ईसाई हम सब है भाई -भाई !
या भारतात बंधु-भाव नित्य वसु दे, दे ..वरचि असा दे… असे फलक घेऊन बहुसंख्य व भरगच्च कार्यकर्त पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अतिशय शांततेच्या मार्गाने शांतता फेरी चे समारोपन करण्यात आले.
त्याप्रसंगी जिल्हा महासचिव डी.के.दामोधर, जिल्हा महासचिव प्रशांत ऊर्फ जांन्टी विणकरे,नगरसेवक संबोधी गायकवाड, आनंदराव वाहूळे, मौलाना शेख मदार, मौलाना सय्यद हुसेन, देवानंद पाईकराव,बाबुराव नवसागरे, एस.के.मुनेस्वर सर, मार्शल विनोद बरडे सर , राजूभाऊ खंदारे, विष्णुकांत वाडेकर, पंकज गायकवाड, पत्रकार शाहरुख पठाण, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, सिद्धार्थ धोंगडे, धम्मदीप काळबांडे, अविनाश दिपके,गौतम कांबळे, विवेक फलटणकर, धम्मदीप पाईकराव, सुधाकर लोखंडे, प्रवेश वाडेकर,सुधाकर कदम,कैलास मासोळकर, अनिल जोगदंडे, मुकिंद गायकवाड, पप्पू गायकवाड, वंचित ब.आ. बिटरगांव शाखा पदाधिकारी,वं.ब.आ.पिरंजी शाखा पदाधिकारी, वं.ब.आ. गांजेगाव पदाधिकारी, सह तालुक्यातुन बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे यांच्या नेतृत्वात सदर शांतता फेरी यशस्वीरित्या संपन्न झाली.




