Home नागपूर मस्जिद वरील भोंगे 3 तारखेलाच काय मुस्लिम समाज कधीच काढणार नाही- दादासाहेब...

मस्जिद वरील भोंगे 3 तारखेलाच काय मुस्लिम समाज कधीच काढणार नाही- दादासाहेब शेळके यांचे स्पष्ट मत

258

🔸राजकीय स्वार्थासाठी जातीय… धार्मिक दंगली पेटवू नका.

✒️नागपूर प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

नागपूर(दि.2मे):;महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा झाली आहे. त्यांनी पाठी मागील दोन सभे प्रमाणेच याही वेळेस मस्जिद वरील भोंग्या संदर्भात आपले तुनतुने वाजविणे सुरू ठेवले आहे.राज ठाकरे यांनी आजच्या सभेत आपली राजकीय दुकानदारी सुरू करण्या साठी समस्त हिंदू समाजाला वेठीस धरून मुस्लिम समाजाला जाहीर धमकी दिली आहे.

3 मे नंतर मस्जिद वरील भोंगे तात्काळ काढा अन्यथा एकदा होऊन जाउ द्या. म्हणजेच उद्या हिंदू मुस्लिम दंगा झालाच तर त्यात मुसलमानाची किंवा बहुजनाची पोरे मेली तर त्यांच्या सरणावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राज ठाकरे तयारच असणार म्हणजे मरायला बहुजनाची पोरे चरायला राज ठाकरे वा रे वा राज ठाकरे मला त्या राज ठाकरेंना विचारायचं आपल्या देशात तुमच्या बापाच राज्य नसून डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानाचे राज्य असून त्याच संविधाना नुसार आपला देश चालत असतो‌. त्याच भारतीय संविधानाने भारतीय संविधान भाग 5 “संघराज्य” अर्टीकल 141 ते 42 नुसार सुप्रीम कोर्टाला नियम ठरविण्याचे अधिकार दिले आहेत.

त्याच सुप्रीम कोर्टाने 18 जुलै 2005 च्या आपल्या आदेशात मस्जिद व इतर प्रार्थना स्थळावरील लाऊड स्पीकर अर्थात भोंगे काढा म्हटले नाही तर त्यांची आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे.मग राज ठाकरे म्हणतात 3 तारखेपर्यंत मस्जिद वरील भोंगे काढा याचा अर्थ राज ठाकरे हे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का ? आणि मस्जिद वरील भोंगे काढण्या संदर्भात राज ठाकरे ने जो इशारा दिला आहे अरे बाबा असे 1 नाही 100 जरी राज ठाकरे आले तरी मुस्लिम समाज त्यांना भीक घालणार नाही.कारण भारतातील मुस्लिम समाज हा भारतीय संविधानाला मानणारा असून तो सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार चालणारा आहे. बाकीच्याचे आदेश तो चुलीत घालत असतो. म्हणून 3 मे तारखेला काय कधीच मुस्लिम समाज मस्जिद वरील भोंगे काढणार नाही. कारण मुस्लिम समाज हा मोडेल पण वाकणारा समाज नाही.पुढील मस्जिद वरील भोंग्याच्या लढाईत भिम टायगर सेना मुस्लिम समाजा सोबतच नाही तर एक पाऊल पुढे असेल एवढे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here