Home महाराष्ट्र खड्डेयुक्त ग्राम सडक योजना की पंतप्रधान ग्राम सडक योजना ?

खड्डेयुक्त ग्राम सडक योजना की पंतप्रधान ग्राम सडक योजना ?

390

🔹संबंधित बांधकाम विभाग व कंत्राटदाराचे अर्थपूर्ण मैत्री मुळे रस्त्याच्या कामा कडे दुर्लक्ष

🔸जिवती तालुक्यातील नविन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे?

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.1मे):- तालुक्याच्या विकासासाठी शासन कोट्यवधी निधी मंजूर करून संबंधित विभागाला देत आहे तालुक्यात चोहीकडे पंतप्रधान ग्राम सडक योजना- मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि इतर योजनेच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराची किड लागली असल्याचे दिसून येत आहे. कुंभेझरी ते नारायनगुडा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीतून सुरु आहे, हे काम मे. गुप्ता कॅनट्रकशन कंपनी नागपूर करत आहे. परंतु हे कंपनी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करत आहे. आता या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे मात्र त्यावरील खडी व डांबर आत्ताच वेगळे होत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी हा रस्ता उखडला जात आहे. कंत्राटदाराच्या गलथानपणामुळे व संबंधित विभागाच्या आशीर्वादाने रस्त्याचे निकृष्ट काम सुरू आहे.

आत्ताच या रस्त्याची खडी बाजूला होऊन रस्त्यावर खड्डे पडायला लागले आहेत त्यामुळे येथील नागरिकांनी नाराजी
व्यक्त केली आहे. कुंभेझरी ते नारायणगुडा डांबरीकरण रस्त्याचे आक्टोबर २०२० मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते. २.८०० किलोमीटर रस्त्यासाठी १२६.४७ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आता कंत्राटदारामार्फत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे, गेल्या दोन दिवसांपूर्वी पासून या रस्त्यावर खडी व डांबराचे अस्तरीकरण करण्यात असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी सय्यद शब्बीर जागीरदार तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना यांना दिली मात्र काम चालू असतानाच हा रस्ता जागोजागी खराब होत आहे, तसेच आक्टोबर मध्ये सुरू झालेला हा रस्ता नऊ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र वर्षे उलटूनही संबंधित कंत्राटदाराने हा रस्ता पूर्ण केला नाही. आता पावसाळा सुरू होणार म्हणून कंत्राटदार घाई घाई मध्ये नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे, का असा आरोप सय्यद शब्बीर जागीरदार तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना यांनी केला आहे.

संबंधित कंत्राटदाराने या रस्त्याचे काम करण्यास दिरंगाई का केली? त्यासाठी वापरण्यात आलेले डांबर व खडी निकृष्ट दर्जाची आहे त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडत आहेत व डांबर उखडून जात आहे कंत्राटदारांच्या या गलथान कारभारामुळे हा रस्ता तयार होताच खराब होत आहे या गलथान पणा मुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जात असल्याचे मत यावेळी सय्यद शब्बीर जागीरदार यांनी व्यक्त केले. प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीतून हा रस्ता होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे या रस्त्याच्या कामाकडे लक्ष असणे गरजेचे आहे मात्र अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे निष्कृष्ट दर्जाचे काम होत आहे या रस्त्याच्या कामाची विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित मे.गुप्ता कंट्रक्शन कंपनी नागपूर या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि संबंधित अभियंतावर कारवाई करावी अन्यथा अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सय्यद शब्बीर जागीरदार तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here