




✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
🔹कामगार हेच देशाचे गौरव- विवेक बोढे
घुग्घुस(दि.1मे):-रोजी जागतिक कामगार दिनानिमित्त घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात कामगारांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कामगारांचे पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले कामगार चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. कामगार हेच देशाचे गौरव आहे. जागतिक स्तरावर कामगार चळवळ सुरु झाली तेव्हा कामगारांची मुख्य मागणी दिवसात आठ तास काम करण्याची होती.
कामगारांच्या प्रयत्नांचे व कार्याचे प्रतिक म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. पूर्वी कामगारांचे मोठया प्रमाणात शोषण केले जात होते. दिवस भरात पंधरा तास कामगारांना काम करावे लागत होते. या अन्यायाच्या विरुद्ध कामगार एकत्र आले व आपल्या हक्कासाठी आवाज उठवीला. 1 मे हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, कामगार अंकुश सोदारी, धनराज जुमनाके, अशोक भोयर, सुरेश पेंदोर, अशोक माजी, भाजपाचे नितीन काळे, अजय लेंडे व किशोर बोंडे उपस्थित होते.




