Home महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीचे आयोजन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीचे आयोजन

259

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.1मे):- माजी आमदार टी एम कांबळे संस्थापक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्राच्या संकल्पनेतुन स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दि 4 मे रोजी च्या सर्वसाधारण सभेला पक्षप्रमुख कनिष्क कांबळे संबोधित करणार आहेत, यावेळी राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर उपस्थित राहणार असून राष्ट्रीय अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष इम्रान मन्सूरी, मुख्य प्रवक्ता ऍड. नितीन माने, प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ कांबळे, राज्य महासचिव श्रावण गायकवाड व नवनिर्वाचित मुंबई प्रदेशाध्यक्ष योगेश गायकवाड आपली मते व्यक्त करणार आहेत.

ज्यांना कुणाला निरोप मिळाला नाही अश्या राज्यातील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन भवन मुंबई येथील कार्यालयात दुपारी 12:00 वाजता उपस्थित राहावे, काही अडचणी आल्यास 9004545045 या भ्रमनध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन कारण्यात आले आहे.

Previous articleलांडगे परिवाराच्या वतीने सत्यशोधक विवाह सोहळ्याचे आयोजन
Next articleग्रामीण भागातील बस सेवा तात्काळ सुरू करून सर्वसामान्यांची हेळसांड थांबवावी – गणीभाई तांबोळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here